पाकिस्तानमध्ये श्रीदेवीचे पिच्चर पाहणाऱ्याला अटक केली जायची….
बॉलिवूड फिल्म्स या फक्त भारतातच लोकप्रिय नाही तर त्या जगभरात लोकप्रिय आहे. फक्त बॉलिवूडचं नाही तर साऊथ इंडियन फिल्म्ससुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये आवर्जून पाहिल्या जातात. इतकंच काय तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी समजला जाणारा पाकिस्तानसुद्धा याला अपवाद नाहीए. पाकिस्तानमध्ये सुद्धा बच्चन, शाहरुख,सलमान ही मंडळी लोकप्रिय आहेत.
एक किस्सा आहे पाकिस्तानचा. भारतीय फिल्म या पाकिस्तानमध्ये दाखवण्यास बंदी होती आणि तिथं श्रीदेवीचे सिनेमे चोरून बघितले जायचे.
पाकिस्तानमधले माजी बीबीसी रिपोर्टर वुसअत्तुलाह खान यांचा एक लेख 26 फेब्रुवारी 2018 रोजी प्रकाशित झाला होता आणि त्यात त्यांनी बॉलिवूड आणि पाकिस्तान यांच्याबद्दल रंजक माहिती लिहिलेली होती.वुसअत्तुलाह हे त्या लेखात लिहितात की जेव्हा उच्चशिक्षणासाठी त्यांनी कराची विश्व विद्यालयात ऍडमिशन घेतलं तेव्हा एका वर्षानंतर त्यांना हॉस्टेलची खोली मिळाली होती. ते म्हणतात की मी श्रीदेवीचा खूप मोठा फॅन होतो. जसं खोलीत सगळं सामान सेट केलं आणि लगेच भिंतीवर श्रीदेवीचे 2 पोस्टर एकमेकांसमोर लावले.
हा तो काळ होता जेव्हा पाकिस्तानमध्ये व्हीसीआरवर इंडियन फिल्म्स बघणं गुन्हा होता.
वुसअत्तुलाह खान सांगतात की त्यांचे हॉस्टेलची मंडळी ही भारतीय सिनेमाला न बघण्याच्या विरोधात होते आणि भाड्याने व्हीसीआर आणून त्यात 6 सिनेमे यायचे आणि त्यातले किमान दोन तरी सिनेमे हे श्रीदेवीचे असायचे. तो काळ जिया उल हक आणि हुकूमशाहीचा होता.जिया उल हक पाकिस्तानचे 4 स्टार जनरल होते पुढे जाऊन तेच पाकिस्तानचे 6 वे राष्ट्रपती बनले.
वुसअत्तुलाह खान सांगतात की त्यांचे मित्र होस्टेलच्या खिडक्या उघडून, आवाज फुल्ल करून श्रीदेवीचे सिनेमे लावायचे जेणेकरुन जिया उल हकच्या हुकूमशाहीचा निषेध करता येईल.जेव्हा आसपासचे पोलीस यायचे तेव्हा ते हसायचे आणि सांगायचे की,
हम तुम्हारी भावनाए समझते हैं, लेकिन जरा आवाज़ कम करके सुना होगा. किसी दिन कोई कड़क अफ़सर आ गया,तो हमारी वर्दी उतरते देख क्या तुम लोगों को अच्छा लगेगा?
त्यांच्या होस्टेलच्या परिसरात दर तीन महिन्याला नवीन पोलीस यायचे त्यातला जमिल नावाचा पोलीस त्यांच्या चांगलाच लक्षात राहिला. होस्टेलच्या चौकीवर जमिल एक वर्ष नियुक्त होता जेव्हा त्याच्या ट्रान्सफरची वेळ आली तेव्हा होस्टेलच्या पोरांनी मेजवानी देण्याचा बेत आखला पण जमिल म्हणाला जेवण राहुद्या एखादा श्रीदेवीचाच पिच्चर दाखवला. तेव्हा त्यांनी मिळून श्रीदेवीचा जस्टीस चौधरी सिनेमा बघितला होता.
पाकिस्तानमध्ये सिनेमे बॅन असूनही त्यातल्या त्यात श्रीदेवीचे सिनेमे बघितले जायचे असा तो काळ होता….!
हे हो वाच भिडू :
- श्रीदेवीचं नाव ऐकल्यावर अफगाण अतिरेकी गोळीबार बंद करायचे..
- तेरा वर्षाची असताना श्रीदेवीला सुपरस्टार रजनीकांतच्या आईचा रोल करायला लागला होता.
- श्रीदेवीची हरवलेली बहिण प्रभादेवी, जी एकच दिवस आली आणि पुन्हा गायब झाली.
- बोनी कपूरच्याही आधी श्रीदेवीने एक सिक्रेट लग्न केलं होतं.