शाहरुख जिच्या शोमध्ये बोलून गोत्यात आला त्या सिमीने एकेकाळी बॉलीवूडला बोल्डनेस शिकवलेला

बॉलिवूड मध्ये आत्ता ज्या सर्रासपणे किसिंग सीन म्हणा किंवा इंटिमेंट सीन म्हणा दाखवले जातात तसं आधी नव्हतं. लग्न झाल्यावर फुल एकमेकाला धडकायची आणि पोरं व्हायची असा वाला सीन असण्याचा तो काळ होता. पण त्या काळात एक अशी अभिनेत्री होती जिच्या बोल्डनेस आणि हॉट अदाकारीने बॉलिवूड गाजवलं होतं. ती अभिनेत्री म्हणजे सिमी गरेवाल. जिथं तीने वयाची साठी पार केली असली तरी ती आजही 25 च्या हिरॉईनला टक्कर देऊ शकते इतकी ती दिसायला तरुण भासते.

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे वय वाढायला लागल्यावर जिम बिम करून आणि फिटनेसवर काम करून तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. सिमी गरेवाल आज घडीला 74 वर्षांची आहे पण इतकं वय असूनही एखाद्या पंचवीशीतल्या पोरीला तिचं तरुणपण लाजवेल. तर आज जाणून घेऊया बॉलिवूडच्या या तरुण अभिनेत्री विषयी.

सिमी गरेवालने कमी वयात भरपूर देशांची भ्रमंती केली. 17 ऑक्टोबर 1947 रोजी दिल्लीमध्ये सिमी गरेवालचा जन्म झाला पण तिचं खऱ्या अर्थाने संगोपन हे इंग्लंडला झालं.तिथल्याच न्यू लँड स्कुलमध्ये बहिणीसोबत तिचं शिक्षण झालं. करियर सुरू होण्याच्या आधीच सिमी गरेवालच्या बाबतीत अफेअरच्या बातम्या बाहेर पडू लागल्या होत्या. 1980 च्या सुरवातीच्या काळात सिमी गरेवालच अफेअर पाकिस्तानचे उद्योजक सलमान तासिर यांच्यासोबत चाललं पुढे सलमान तासिर गव्हर्नर बनले मात्र सिमीने लग्न केलं ते रवी मोहन सोबत.

रवी मोहन सोबत केलेलं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. सिमी गरेवालचं लहानपण भलेही इंग्लंडमध्ये गेलं पण जसा जवानीचा काळ सुरू झाला तसं ती भारतात आली. इंग्रजी भाषेवर तिची असलेली कमांड यामुळे टार्जन गोज टू इंडिया हा सिनेमा तिला ऑफर झाला तेव्हा सिमी गरेवाल फक्त 15 वर्षांची होती. 1962 साली फिरोज खानसोबत सिमी गरेवालने डेब्यु केला.

सिमी गरेवालला आजवरची सगळ्यात लकी अभिनेत्री मानलं जातं कारण तिने राज कपूर, सत्यजित रे, मृणाल सेन आणि राज खोंसला अशा दर्जेदार दिग्दर्शकांसोबत काम केलं.

तसं बघितलं तर सिमी गरेवालने बरेच सिनेमे केले पण मेरा नाम जोकर आणि सिद्धार्थ या दोन सिनेमांनी तिला चांगलीच ओळख मिळवून दिली. यश चोप्रा यांची 1970 आणि 2003 ची अनुक्रमे कभी कभी आणि चलते चलते या दोन सिनेमांमुळे तिला आणखीनच सुकाळ बघितला. कर्ज सिनेमात केलेला निगेटिव्ह रोल सिमीला कौतुकाची थाप देऊन गेला.

1980 च्या दशकात सिमीला वाटलं की काहीतरी नवीन केलं पाहिजे. मग ती लेखन आणि दिग्दर्शनाच्या वाट्याला गेली. याच काळात तिने स्वतःच प्रोडक्शन हाऊस सिगा आर्ट इंटरनॅशनल सुरू केलं. प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून दुरदर्शनसाठी टीव्ही सिरीज इट्स वुमन वर्ल्डचं लेखन-दिग्दर्शन आणि निर्माती सिमी बनली.

चॅनल 4 साठी सुद्धा तिने काम केलं. या चॅनल सोबत काम करताना सिमी गरेवालने एक डॉक्यूमेंट्री बनवली लिविंग लिजेंड राजकपूर नावाने. ही डॉक्युमेंटरी इंडियाज राजीवला फॉलो करत बनवली होती. या डॉक्युमेंटरी साठी तिने राजीव गांधींचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला होता. रुखसत या हिंदी फिचर फिल्मच लेखनसुद्धा सिमीने केलं.

इंडियाज मोस्ट डिझायरेबल या टीव्ही शो साठी अँकर म्हणूनसुद्धा सिमी गरेवालने काम पाहिलं. बीबीसीच्या महाराजा डॉक्युमेंटरी साठीसुद्धा सिमी गरेवालने काम केलं. इतकं काम करूनही ती टिव्हीवरून गायब झाली नाही. 2019 साली ती चॅट शो रँदे व्हू  विद सिमी गरेवाल ( सिमी गरेवालचा अड्डा ) घेऊन आली. सौंदर्याची खाण म्हणून आजही सिमी गरेवालला ओळखलं जातं. बॉलिवूडची आजही सगळ्यात देखणी तरुण हिरोईन म्हणून तिची ओळख आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.