अतिरेक्याची बायकोच म्हणतेय भारत बेस्टय, पाकिस्तान काश्मिरी पोरांना गंडवतय

जगातल्या सगळ्यात मोठ्या आर्मी पैकी एक असलेल्या भारतापुढं ज्या पाकिस्तानला स्वतःचा देश सांभाळून ठेवणं अवघडय  तो काश्मीर कसा घेणार असं सिम्पल लॉजिक. काश्मीरच्या पोरांना पाकिस्तान तुम्हाला गंडवतय हे भारत सरकार सारखं सांगतंय पण त्यातल्या काहींच कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच सारखा ‘ॲटीट्यूड’.

आता मात्र पाकिस्तान मधून आलेली एका दहशतवाद्याची बायकोच पाकिस्तान कसं काश्मिरी तरुणांचा वापर करून घेतंय हे सांगायला लागलेय.

रझिया बीबी असं या काश्मिरी महिलेचं नाव आहे ज्यांना पाकव्याप्त काश्मीर मध्ये नेऊन त्यांचं एका दहशतवाद्याशी लग्न लावण्यात आलं होतं. पण त्यांचं हे लग्न जास्त काळ टिकला नाही. सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत त्यांचा दहशतवादी नवरा मारला गेला . हिजबुल दहशतवाद्याची यानंतर महिलेला काही दिवस राहण्यासाठी पैसे देण्यात आले, मात्र नंतर तेही थांबले. आता ही महिला तीन मुलांसह आपला संभाळ करणं त्यांना अवघड झालं होतं.

मेल्यांनंतर जन्नत भेटेल म्ह्णून ज्याचा ब्रेनवॉश केला होता आता त्याच्या पोराबाळांना मरणयातना सहन कराव्या लागत होत्या.

शेवटी मग त्यांना पाकिस्तानातून भारतात परतावं लागलंय. ते पण पाकिस्तान टु कतार आणि मग कतारमधून नेपाळमार्गे भारत.

भारतात आल्यावर मात्र त्यांनी पाकिस्तानचं खरं रूप दुनियेला दाखवायला सुरवात केलीय.रजिया बीबी म्हणतात की, मी म्हणेन की कोणीही मुजाहिद बनू नये, कारण जे काहीभोगायला लागले आहे ते इतर कोणावरही येऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या अम्मीचा पाठिंबा होता. त्यामुळं मी ह्यातून बाहेर पडू शकले. जे मुजाहिदनांशी लग्न करतात त्यांचं आयुष्य वाया जातं.काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादावर रझिया बीबी म्हणाल्या,

इस्लामच्या नावाचा गैरवापर करून काश्मीरमधील तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले जात आहे.

दहशतवादी खोटं आश्वासन देऊन काश्मिरी पोरांचा ब्रेनवॉश करतात त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब सोडतात. जो पाकिस्तान स्वतःची काळजी घेऊ शकत नाही मग तो भारतातील लोकांची काळजी कशी घेणार? त्यांनी माझ्या पतीला मरायला पाठवले होते.

कधीकाळी दहशतवाद्याची अर्धांगिनी राहिलेल्या रझिया बीबी आता मात्र भारतात परतणं हा माझा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट निर्णय असल्याचं सांगतायत.

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी पाकिस्तान मधल्या मुझफ्फराबादमध्ये नेलेल्या रझियांचे २००८ मध्ये एका हिजबुलशी लग्न झालं. त्यानंतर २०१८ मध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तिचा पती मारला गेला. पतीच्या निधनानंतर तिचे स्वतःचे आयुष्यही खूप संकटात गेले. रझिया सांगतात की ज्या लोकांकडून तिला खूप आशा होत्या. कठीण प्रसंगी त्यांनी तिला साथ दिली नाही. आता मात्र भारतात परतल्यांनंतर आपलं आयुष्य नीट मार्गी लागेल अशी त्यांना आशा आहे.

नोव्हेंबरमध्ये भारतात परतल्यानंतर रझिया बीबी यांनी केवळ वृद्ध कुटुंबच नाही तर जम्मू-काश्मीरच्या पोलीस-प्रशासन आणि सुरक्षा दलांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याचं म्हटलंय. दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील अनेक तरुणांचे भविष्य खराब केले, त्यामुळे कोणीही दहशतवादी बनू नये, असे आवाहन रझिया करत आहेत. कोणीही दहशतवादी बनून आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये अशी कळकळीची विनंती त्या मीडियासमोर करत आहेत. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.