संपात फूट पडली अनं मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली

गेल्या महिन्यापासून म्हणजे २७ ऑक्टोबरपासून राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारामुळे कुटुंब चालवताना अनेक अडथळे येतात, अश्या परिस्थितीत ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात यावे आणि आंध्रप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावं, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी लावून धरली होती. 

कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन हळू-हळू जास्तचं चिघळत गेलं. राज्यभरातल्या सगळ्या एसट्या डेपोत उभ्या केल्या गेल्या, कर्मचारी ठिकठिकाणी आंदोलनाला बसले, या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरण देखील पाहायला मिळाली, प्रवाश्यांचा खोळंबा केला गेला, एसटीच्या तोडफोडी प्रकरणी आतापर्यंत ३६ एफआरआय दाखल करण्यात आल्यात, या संपामुळे एसटी महामंडळाचे जवळपास १ कोटी २५ लाखांचं नुकसान झाल्याचं समजतंय.

पण आता इतक्या दिवसांच्या गोंधळानंतर पुन्हा एकदा एसटी रस्त्यावर धावायला सुरुवात झाली आहे. 

खरं तर हायकोर्टाने आदेश देऊनही एसटी कर्मचारी आंदोलनावावर ठाम होते, अश्या परिस्थितीत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं.  त्यामुळे एसटी महामंडळाने (MSRTC) एसटी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे संप मागे घेण्याचे आवाहन केले. 

एसटी महामंडळाने पत्राद्वारे म्हंटले कि, 

“कोरोना महामारीमुळे आधीच एसटी महामंडळावर कारचाच बोजा वाढलाय, त्यामुळे संप ताणून महामंडळाला आर्थिक धोक्यात टाकू नका. एसटीला १२००० कोटी रुपयांचा तोटा असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांचे दिले गेले आहे.  राज्य शासनाने सुद्धा ३,५४९ कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे पुढेही सर्वाना वेळेवर वेतन देण्याचा प्रयत्न केला जाईल. 

तसेच, आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता मान्य केला आहे. त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. “

महामंडळाच्या या पत्रानंतर काही वेळातच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपत फूट पडली आणि चार दिवसानंतर पहिली एसटी बस धावली. आज दुपारी २.३० वाजता मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. चालक आर. आर. देवरे आणि वाहक एस. एस. माने यांनी डेपोतून ही एसटी काढली. 

 यानंतर अक्कलकोट आगारातूनही काही बसेस सुटल्या. इस्लामपूर-वाटेगाव  आणि अक्कलकोट ते सोलापूर अश्या दोन्हीही बसेस या आगारातून सुटल्या. तसेच रत्नागिरी विभागातूनही एसटी रवाना झाल्या.  यासोबतच ८२६ एसटी रस्त्यावर धावत असल्याचं प्रशासनाण म्हंटल.

एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकासोबतच मॅकेनिकल स्टॅफ कामावर रुजू झाला आहे. महामंडळात ९२ हजार ७०० कर्मचारी आहेत. त्यातले २ हजारपेक्षा जास्त कर्मचारी कामावर आले आहेत. 

महामंडळाच्या म्हणण्यानुसार जर आणखी कर्मचाऱ्यांची गरज पडली तर ट्रेनिंग पूर्ण झालेल्यांना कामावर जॉईन केलं जाईल. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.