ना हिंदूंचा, ना मुस्लीमांचा. ताजमहल तर इटलीचा..? काय आहे ही थेअरी…

ताजमहल नाय रे तेजोमहाल. हिंदूचं मंदीर आहे ते काय पण काय बोलतो. सोशलमिडीया अस्तित्वात येण्यापुर्वीपासून ताजमहल ही मुघलांची देण नसून ती हिंदूची देण आहे ही थेअरी प्रसिद्ध आहे.

या थेअरीला प्रसिद्ध करणारे व्यक्ती होते पु.ना.ओक.

पु.ना. ओक यांनी ख्रिश्चॅनिट नाही तर कृष्णनिती, ताजमहल नाही तर तेजोमहल अशा वेगवेगळ्या थेअरी मांडल्या. यासाठी वेगवेगळे आधार दिले. पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या आधारांना कोणतेही शास्त्रीय कारण नव्हते. फक्त या छान छान गोष्टी होत्या.  

पण फक्त ताजमहलवर आमचाच असा दावा ठोकणाऱ्यात पु.ना.ओकच नव्हते तर इटली आणि फ्रान्स देखील होते. ताजमहलबाबतची ही एक तिसरीच थेअरी आहे. ऐकीव असली तरी ती कुठून आली कशी आली हे सांगण आमचं काम आहे. 

तर या थेअरीनुसार मुघलांच्याकडे इतकी प्रगल्भता नव्हती, ज्ञान नव्हतं की ते ताजमहल सारखी वास्तू बांधू शकतील. ही वास्तू फ्रान्स आणि इटलीची देण आहे. 

नेमका काय आहे हा प्रकार…? 

तर १६४० च्या ख्रिसमस दरम्यान फादर सेबस्टियन मैनरिक आग्रात पोहचले होते. याच काळात ताजमहलच बांधकाम सुरू करण्यात आलं होतं. मुळचे पौर्तुगालचे असणारे हे फादर आठ वर्ष धर्म प्रसारासाठी ब्रह्मदेशात होते. ब्रह्मदेशातून येवून ते आग्र्यात थांबले होते. 

या मैनरिक यांनी आपलं प्रवास वर्णन दोन खंडामध्ये प्रकाशित केलं. हे प्रकाशन १६४९ मध्ये करण्यात आलं. 

या प्रकाशनात त्यांनी जे काही लिहलं ते खूप खूप वर्षांनंतर म्हणजे १८८० च्या दरम्यान चर्चेत आलं. या प्रवासवर्णनात त्यांनी लिहंल आहे की, 

तिथे चाललेल्या कामाचे आर्टिटेक व्हेनिसचे गेरोनिमो वेरोनियो होते. ते पोर्तुगाल मधून इथे आलेले आणि मी जाण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्यांचे लाहोर मध्ये निधन झाले होते. 

त्यांचे हे लिखाण १८८० साली गाईट टू आगरा मध्ये छापण्यात आलं. ते बरच प्रसिद्ध झालं आणि युरोपात एक टुम निघाली की ताजमहल हा युरोपीयन लोकांनी बांधला आहे. त्यानंतर आग्राच्या पादरी सैटॉस सेमेट्रीमध्ये वेरोनिया याचा मकबरा मिळाला. याच गोष्टीमुळे ताजमहल हा युरोपचाच सांगण्याच्या मोहिमेने जोर पकडला. 

त्याचसोबत दूसरा दावा देखील समोर आला.. 

यानंतर दूसरा दावा समोर करण्यात येवू लागला. यानुसार ताजमहलचं डिझाईन करणारा विरोनिया नव्हता तर एक फ्रान्सचा व्यक्ती होता. त्याचं नाव ऑस्टिन ऑफ बॉरड्यू. या थेअरीनुसार ऑस्टिन हा दागिण्यांचा व्यापारी होता व तो मुघलांसोबत देखील दागिण्यांचा व्यापर करायचा. तो व्यापारासाठी मुघलांकडे होता त्याच दरम्यान ताजमहल बांधण्यात आला. हे डिझाईन तर त्याने तयार केलेलं आहे. 

झालं इकडे जसा एकमेकांसमोर दावा मांडला जातो तसच झालं. मैनरिक यात्रा वृत्तांताचा १९२७ साली इंग्रजी वृत्तांत छापला गेला व त्यामध्ये ऑस्टिन नाही तर विनोरियाच ताजमहलचा डिझायनर होता हे सांगण्यात आलं. 

त्यानंतर विनोरिया आणि ऑस्टिन यांचे समर्थक इतिहासकार वेळोंवेळी आपआपला दावा मांडत गेले. कोण म्हणालं फ्रान्सचा ऑस्टिनच तर कोण म्हणालं इटलीचा विनोरियाचं. पण याहून अधिक पुरावे कोणाकडेच नव्हते आणि नाहीत पण तरिही आजही ताजमहलचं डिझाईन आमचचं असल्याची टुम युरोपात निघतच असते. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.