आजच्या दिवशीच जपानवर अणुबॉम्ब टाकला होता; बेचिराख झालेल्या जपानने प्रगती कशी केली

तारीख होती ६ ऑगस्ट १९४५. जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. यात हजारो नागरिक मारले जातात. या हल्ल्याच्या तीन दिवसानंतर म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी जपानच्या नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. यामुळे अख्खा जपान देश बेचिराख झाला होता. 

या अणुबॉम्ब हल्ल्यात २ लाखांपेक्षा जास्त जपानच्या नागरिकांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेने केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यामुळे कधी काळी इस्ट आशियातील आर्थिक महासत्ता असणारा जपान बेचिराख झाला होता. अनेकांना वाटत होते की आता जपान कधीच उभा राहू शकत नाही. मात्र जपानने सगळ्या गोष्टी खोट्या ठरवल्या.

अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जपानला उभं राहिला खूप वेळ लागेल असं सांगितलं जात होत. आजचा जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या नंबरवर आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन निर्मिती करण्यात जगात टॉपला आहे. अणुबॉम्ब हल्ल्यात सगळं गमावणार जपान कमी एवढ्या वर कसा गेला यामागे मोठा इतिहास आहे.

यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्या देशाने जपानला बेचिराख केलं होत. त्याच अमेरिकेचा जपानला उभं करण्यात मोठा वाटा आहे 

अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जपान दोस्त राष्ट्रांन समोर सरेंडर झाला. यानंतर या देशांनी जपानचे पुर्नवसन करण्यात येईल असे ठरविले. यात अमेरिकेच्या सैनिक मोठ्या प्रमाणात होते

आर्थिक गोष्टींबरोबर अमेरिकेने अनेक आघाड्यांवर काम केले. महत्वाचं म्हणजे जपानवर ही वेळ युद्धामुळे आली होती. भविष्यात जपाने कधी युद्धच करू नये अशा प्रकारची योजना अमेरिकेने तयार केली. पहिले ३ वर्ष अमेरिकेने यावरच काम केले. यासाठी नवीन संविधान लिहले गेले. यात जपानला स्वतःची आर्मी ठेवता येणार नाही असा कायदा करण्यात आला. 

राजेशाही नावाला ठेवून संसदीय पद्धत आणली.  

नवीन संसद राष्ट्रीय डाइट बांधण्यात आली. तसेच नॅशनलिस्ट संघटना बॅन करण्यात आल्या. शस्त्र निर्मती करणारे कारखाने बंद केले गेले. महायुद्धात महत्वाची भूमिका घेणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढण्यात आले. युद्धावेळी पंतप्रधान असणारे हिदेकी होजो आणि त्यांच्यासह इतर सहा जणांना फाशी दिली गेली.    

या संपूर्ण काळात अमेरिका जपानच्या आर्थिक बाबतीत कुठलाही निर्णय घेत नाही. मात्र या काळात जपानच्या राजकीय पद्धतीत बदल केला गेला. दुसरीकडे अमेरिका आणि रशियात शीत युद्धाला सुरुवात झाली होती. १९४९ मध्ये चीन मध्ये कम्युनिस्ट सरकार आले होते. दोन मोठ्या देशांमध्ये कम्युनिस्ट सरकार असणे हे अमेरिकेला धोक्याची घंटा वाटू लागली. 

पॅसिफिक महासागरा दरम्यान आपले वर्चस्व वाढविण्यासाठी साऊथ इस्ट आशिया मध्ये एक मित्र  देश असावा असे अमेरिकेला वाटू लागली होते. कम्युनिजम रोखायचे असेल तर हे काम फक्त जपानचं करू शकत होते. 

त्यामुळे जपानच्या आर्थिक बाबींकडे लक्ष द्यायला अमेरिकेने सुरुवात केली.   

जपान मधील अर्ध्या पेक्षा जास्त शेत जमिनी श्रीमंत लोकांकडे होत्या. यांच्या जमिनी खेड्यात होत्या आणि हे लोक शहरात राहायचे. अमेरिकेने या शेत जमिनी स्थानिक लोकांना दिल्या. यामुळे नवीन शेतकरी तयार झाले. याचा फायदा महागाई रोखण्यात झाला.

जपानचे आर्थिक नियंत्रण हे एका गटाच्या हातात होते. त्याला ज़ाइबात्सु असे म्हटले जात होते. आर्थिक बाबींबरोबर तिथल्या राजकारणावर वर्चस्व या ज़ाइबात्सु गटाचे होते. त्यांची मोनोपॉली होती. अमेरिकेने या गटाचे वर्चस्व मोडून काढले आणि आर्थिक बाबींचे विकेंद्रीकरण केले. 

जपानच्या वस्तुंना अमेरिका आपली बाजारपेठ उपलब्ध करून देतेच. त्याच वेळी १.९ बिलियन डॉलरची मदत सुद्धा केली.  

जपानचे पंतप्रधान शीगेरू योशिदा यांनी १९४९ मध्ये मिनिस्ट्री ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड इंडस्ट्री नवीन मंत्रालय सुरु केलं. यात सरकार आणि मोठ्या औद्योगिक संस्था यांच्यात सोबत करार करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले गेले. या मंत्रालय उत्पादन करणाऱ्या आणि हेवी इंडस्ट्री कंपन्यांना प्रमोट केले. आणि निर्यात कशी वाढेल यासाठी काम केले. 

१९५० ते ५३ दरम्यान कोरियन देशात युद्ध चालले. याचा फायदा झाला तो जपानला. 

या युद्ध दरम्यान राष्ट्रसंघाचा शांती सेना जपान मध्ये होत्या. युद्धात लागणाऱ्या अनेक गोष्टी जपान मधील कंपन्या तयार केल्या आणि विकल्या. यामुळे अनेक उद्योग वाढले. अमेरिके सोबत असणाऱ्या मैत्रीमुळे जपानच्या सुरक्षा बाबत काळजी  घेते. शस्त्र खरेदीवर पैसे खर्च करण्याऐवजी ते पैसे इंडस्ट्री वाढीसाठी वापरायचे.       

दुसऱ्या महायुद्धा नंतर इंडस्ट्री, कंपन्या बेचिराख झाल्या होत्या. त्यामुळे नव्याने औद्योगिक कंपन्या सुरु करण्यात आल्या. या सगळ्या सुरु करतांना नवीन तंत्रज्ञानचा उपयोग करण्यात आला. १९५९ मध्ये सरकारने देशात तयार होणाऱ्या वस्तूला लोकल मार्केट मध्ये प्रोमोट तर केलंच त्याच बरोबर निर्यात कशी वाढ होईल याच्यावर सगळं फोकस केलं.     

दुसरीकडे लोकांचे इन्कम डबल कसे होईल याकडे लक्ष दिले. लोकांसकडे येणारे पैसे वाढण्यामुळे लोक अधिक खरेदी करू लागले. इतर देशांमध्ये जपानच्या वस्तुंनामागणी वाढली होती. यामुळे मोठ्या आणि वस्तू वाहून नेणाऱ्या जहाज बांधणी देशातच करण्यात येऊ लागली. 

जपानी वस्तू आपली क्वालिटी आणि विश्वासार्हतेमुळे जगभरात ओळखू लागल्या होत्या. यामुळे जपानच्या निर्यातीत मोठी वाढ झाली. १९७२  मध्ये इस्ट जमर्नी मागे टाकून जपान जगातील तिसऱ्या नंबरची अर्थ व्यवस्था असणारा देश बनतो. 

जपान रेडिओ, टिव्ही, कॅमेरा, मोटारसायकल, स्टील, कापड, शिपिंग सारख्या उद्योगात आघाडीवर गेले.     

सरकार स्थिर राहील तर देश स्थिर राहतो असं नेहमी बोलण्यात येते. याच उदाहरण जपान म्हणून पाहता येईल. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) ही जपान मधील मोठा पक्ष. हा पक्ष जुना विचारांचा असला तर उद्योग आणि व्यवसायच्या बाबतीत भूमिका चांगली होती. 

या पक्षाला शेतकऱ्याचा पाठिंबा होता. यामुळे १९५२ ते १९९३ या ५० वर्षांच्या काळात एलडीपीचे सरकार होते.  या सगळ्यात जपान शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आला. आर्थिक बाबत जगाच्या नकाशावर जपान ठळकपणे दिसतो त्याच कारण म्हणजे इथला लिटरसी रेट आणि आधुनिक शिक्षण. 

आर्थिक बाबत जपान सक्षम होण्याबाबत अजूनही गोष्ट महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे,

पश्चिम देशांमधून आलेले तंत्रज्ञान आणि क्वालिटी कंट्रोल सिस्टीम याबद्दल जपानचे सरकार नेहमी आग्रही होते. अमेरिके सोबत मैत्री आणि सरंक्षण बाबतीचा करार, निर्याती बद्दलचे धोरण धोरण, आणि कामाचे अमर्याद तास. जापनीज कॉरपरेशन कर्मचाऱ्यांना पर्मनंट नोकरी देतात. यामुळे कर्मचारी जास्तवेळ कामी करतात. यामुळे जापनीज इंडस्ट्री लवकर वाढली.     

महायुद्धानंतर काही वर्ष तर उद्योग क्षेत्र उभे राहायला लागले.

 वीज, कोळसा, स्टील, केमिकल सारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात इनव्हेसमेंट करण्यात आली.   १९५० मध्येच जपान उत्पादनाची सरासरी गाठत. १९५३ ते १९६३ अशी सलग १० वर्ष देशाचा जीडीपी दरवर्षी ९ टक्क्यांनी वाढतो. १९६४ मध्ये जपान ऑलम्पिक आयोजन करत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर नाव घेतलं जाऊ लागलं. 

मायनींग, बांधकाम सारखे क्षेत्र ४१ टक्के कामगारांना  रोजगार देत होती. तर शेती २६ टक्के कामगारांना रोजगार देत होती. लाखो माजी सैनिक यांनी कामगार म्हणून उद्योग क्षेत्रात आले होते. यामुळे शिस्त आणि उच्च शिक्षण घेतलेलं लोक जपानच्या उद्योग क्षेत्राला मिळाले. यांनी जपानला पुढे येण्यात महत्वाची भूमिका निभावली.    

यामुळे ८० च्या दशकात जपानची अर्थव्यवस्था मजबूत स्थिती पोहचली होती. अविकसित  देशांना जपानने ऍड देत होता. या देशांना बरीच आर्थिक मदत करत होता. या सगळ्या काळात जपान मध्ये फक्त ३ टक्के महागाईचा दर होता. बेरोजगारी सुद्धा ३ टक्केच होती. १९८० मध्ये जपानने अमेरिका, युरोप सारख्या देशात  कापड, कार निर्मिती, इलेकट्रोनिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्थापन केल्या. 

जपान पुढे जाण्यात अमेरिके बरोबरच तिथले राजकारणी आणि मेहनती लोकांमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर जपान उभा राहुल शकला. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.