चान्स होता सभागृहाला सामोरं जावून इतिहासाला दखल घ्यायला लावायचा पण शेवट फेसबुक लाईव्हच
“अगर पार्टी तोडकर सत्ता के लिए नया गठबंधन कर के सत्ता हाथ आती है तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से भी छूना पसंद नही करूंगा..”
या वाक्याला आज २६ वर्ष झालेली आहेत. तरिही हे वाक्य आज व्हायरल होत आहे. इतिहासाने या वाक्याची दखल घेतली आहे. कारण हे वाक्य आहे वाजपेयींच आणि त्याहून महत्वाचं आहे ते म्हणजे हे वाक्य ते कोणत्याही सभेत, आंदोलनात बोललेले नव्हते तर ते जिथे हे वाक्य बोलले होते ते होतं भारताच्या संसदेचं सभागृह..
जास्त लाबंची गोष्ट नाही, अगदी कर्नाटकातली मागची विधानसभा निवडणूक.
या निवडणूकीत बहुमत नसताना देखील येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. पण ते सभागृहाला सामोरे गेले. सभागृहात भाषण केलं आणि राजीनामा सुपूर्त केला..
इतिहासातली राजीनामा देणारी सर्वात चांगली वाटणारी गोष्ट म्हणजे १९९६ ची घटना.
१३ दिवस पंतप्रधान पदावर राहून बहुमत सिद्ध न करता आल्यानं अटल बिहारी वाजपेयींनी राजीनामा दिला होता. ११ व्या दिवशी संसदेत विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला. जवळपास ३ दिवस विश्वास मत प्रस्तावावर चर्चा झाली.
सरकार स्थापनेसाठी आवश्यक ते संख्याबळ जवळ नसताना देखील वाजपेयींनी घेतलेल्या सत्ता स्थापनेच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
आता उत्तर देण्याची वेळ अटलजींची होती. लोकसभेचे लाईव टेलीकास्ट चालू होत. संपूर्ण देश अटलजींना ऐकत होता. वाजपेयी म्हणाले,
“माझ्यावर आरोप लावले गेले की, मला सत्तेचा लोभ आहे. मागच्या १२ दिवसात जे केले ते सत्तेच्या मोहापायी केले, मी मागच्या ४० वर्षांपासून सदनात आहे. सगळ्यांनी माझं आचरण बघितले आहे. कधीच सत्तेच्या मोहापायी चुकीचं काम केलेलं नाही”.
पण अटलजी तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी धीर-गंभीर होत विरोधकांकडे तिरका कटाक्ष टाकला आणि म्हणाले,
“अगर पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन कर के सत्ता हाथ आती है तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से भी छूना पसंद नही करूंगा”..
पण या सर्व गोष्टी पटलावर आहेत. संसदेच्या सभागृहात आहेत…
हीच संधी होती ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे..
आज देशभरात मोदीविरोधी पक्ष संघटित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. ऑपरेशन लोटसच्या मार्फत भाजप सत्तेचा खेळ करत आहे. पण हे सगळं कोणत्याही फेसबुकच्या पेजवरून सांगणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं सभागृहाचं महत्व..
त्याचं कारण आहे, आपल्याकडची लोकशाही..
सभागृहात जर उद्धव ठाकरे बहुमताला सामोरे गेले असते तर नुसतं बहुमत सिद्ध करावं लागलं असत का? तर नाही. तिथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी सह शिवसेनेच्या आमदारांना देखील आपल्या भूमिका मांडता आल्या असत्या. विशेष म्हणजे या भूमिका पटलावर आल्या असत्या.
अन् त्याचाच फायदा घेवून उद्धव ठाकरेंना राजीनाम्याचं भाषण करता आलं असतं. एखाद्या फेसबुक लाईव्ह वरून भाषण देणं आणि सभागृहात भाषण देण यात खूप फरक असतो. मुख्यमंत्रीपदाची धूरा हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरेंवर फेसबुक लाईव्ह करतात, प्रत्यक्षात भेटत नाहीत, मंत्रालयात आले नाहीत अशाच टिका झाल्या. या टिका मोडून काढत सभागृहाला सामोरे गेले असते तर याच भाषणाने एक दूसरा इतिहास देखील लिहला असता.
हे ही वाच भिडू :
- जाता जाता ठाकरेंनी आगरी-कोळी मतांच्या जोरावर एकनाथ शिंदेंना पाडण्याचा प्लॅन केलाय..
- बहुमत चाचणी म्हणजे काय? चाचणीची प्रक्रिया सुरुवात ते शेवटपर्यंत अशी असते…
- माजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून आले…