म्हणून तिहार जेलच्या सुरक्षाचे काम तामिळनाडू स्पेशल पोलिस फोर्सकडे आहे…

तिहार जेल मधील तपासणी दरम्यान उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अंकित गुज्जरकडे मोबाईल सापडला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिहार जेलचे उपअधीक्षक नरेंद्र मीणा आणि गुंड अंकित गुज्जर मध्ये वादविवाद झाला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंकित गुज्जर सोबत राहणाऱ्या इतर आरोपींनी त्याची हत्या केल्याचे जेल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.  मात्र अंकित सोबत राहणाऱ्या एक कैदीची दुसरा दिवशी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर त्याने अंकित गुज्जरची हत्या ही कैद्यांनी केली नसून तेथील सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

त्यानंतर आता तिहार जेलचे उपअधीक्षक नरेंद्र मीणा यांच्याकडे संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यानंतर आता देशभरातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार जेलमधील कैद्यांच्या सुरक्षतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

तिहार जेलची सुरक्षा

दक्षिण आशियातील सर्वात मोठी जेल म्हणून तिहारची ओळख आहे. दहशतवादी, कुख्यात गुंड या जेल मध्ये बंद आहेत. तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यासारखे मोठे व्यासायिक सुद्धा या जेल मध्ये आहेत.

त्यामुळे तिहार मध्ये सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात येते. सीआरपीएफ, इंडो-तिबेटीयन बोर्डर पोलीस, जेल स्टाफ बरोबरचं तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्सकडे जबाबदारी आहे. मात्र कैद्याच्या मुख्य सुरक्षेची जबाबदारी मात्र तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्सकडे देण्यात आली आहे.

नेमकी कुठलही कारणे आहेत की, देशातील सर्वात महत्वाच्या जेलची सुरक्षा तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्सकडे देण्यात आली आहे.

तिहार जेलची क्षमता १0 हजार कैद्यांची आहे. मात्र सध्या तिथे २० हजार पेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आले आहेत. तिहार जेल मध्ये सर्वाधिक आरोपी उत्तर भारतीय असून ते हिंदी बोलतात. संवाद झाला की पुढे अनेक गोष्टी घडतात त्यामुळे आरोपी आणि सुरक्षारक्षकांमध्ये बोलणी होवू नये म्हणून जेल प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्याचा विचार सुरु झाला होता.

सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड न करता काय करता येईल याचा विचार जेल प्रशासन करत होते. त्यावेळी हिंदी न बोलता येणाऱ्या सुरक्षा संस्थेकडे देण्याचा विचार करण्यात आला आणि त्याची जबाबदारी तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्स देण्यात आली.

तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्स

गेल्या अनेक वर्षापासून तिहार मधील कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तामिळनाडू पोलीस स्पेशल कडे आहे.  वर्षानुवर्ष तिहार जेल मध्ये बंद असणाऱ्या कुख्यात गुंडांचे आणि पोलिसांचे साटेलोटे होऊ नये म्हणून सरकारने तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्सकडे महत्वाची जबबदारी दिली आहे.

तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्स स्पेशल जवान तिहार मधील कुख्यात आरोपींवर लक्ष ठेवून असतात. या जेल मध्ये केवळ कुख्यात गुंडच नाही तर आतंकवादी सुद्धा इथे बंद आहेत. तर काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फाशीची सुविधा असणाऱ्या जेल पैकी एक तिहार जेल आहे.

देशाच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सर्वात खतरनाकआरोपी तिहार जेल मध्ये आहेत. त्यामुळे तगडी सुरक्षा व्यवस्था उभी करण्यात आली आहे. कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे काम तामिळनाडू पोलीस स्पेशल फोर्स करत असते.

भ्रष्टाचारच्या आरोपाखाली माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना तिहार जेल मध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांना सेल नंबर ७ मध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी तामिळनाडू पोलिसाकडून काढून घेण्यात आली होती.

पी. चिदंबरम यांना तिहार जेल मध्ये सुद्धा झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर सीसीटीव्ही मार्फत लक्ष ठेवण्यात येत होते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.