लग्न न जमणारे आणि सिंगल असणारे यांची हक्काची जागा म्हणजे टिंडर…..

टिंडर हे नाव तर आपण ऐकलंच असेल, नसेल ऐकल तर एखाद्या सिंगल पोराला विचारा का भाऊ हा टिंडर काय प्रकार आहे. टिंडर होता सबके पास है, सब छुपाके रखते है असा प्रकार आहे या ऍपचा. फेसबुकवर पोरांच्या \ पोरींच्या फोटोखाली कमेंट टाकून पोरं\ पोरी पटत नसतात म्हणून बहुतेक टिंडरचा शोध लागला असावा असा जबरी गैरसमज बऱ्याच लोकांचा झाला असेल. ऑनलाईन डेटिंग ऍपचा पर्पज असलेलं टिंडर जगात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ऍप आहे. पण याची हिस्ट्री सुद्धा लै बापय आणि तितकीच महत्वाचीसुद्धा आहे.

टिंडरचा शोध लावला तो सिन रॅड याने. यात सिन रॅडला मदत केली ती त्याचे पार्टनर असलेले जस्टिन मतीन, दिनेश मुरजानी आणि जोनाथन बडीन यांनी. सिन आणि जस्टिन हे दोघे कॅलिफोर्निया विद्यापीठात भेटले तेव्हापासून त्यांच्या डोक्यात वेगळे विचार सुरु होत कि काहीतरी नवनिर्माण केलं पाहिजे. कॉलेज संपल्यावर दोघेही नोकरीसाठी निघून जात असायचे.

सिन आणि जस्टिन हे दोघेही आपापल्या कामाला वैतागलेले होते त्यामुळे स्वतःच काहीतरी सुरू करण्याच्या विचारात ते होते. यावर त्यांना एक आयडिया सुचली कि अनोळखी लोकांना आपण एकदम सामान्यरित्या भेटलो पाहिजे कसलाही ऑकवर्डपणा त्यात नसला पाहिजे. फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवर आपले ओळखीचेच लोकं जास्त होते. पण अनोळखी लोकांना कस भेटायचं यावर त्यांनी टिंडरच्या डेटिंग ऍपचा पर्याय निवडला.

टिंडर हा प्यार को बेचता है वळला सिन आहे. टिंडरच्या अगोदरही बरेच ऍप होते पण टिंडर इतकं लोकप्रिय कस झालं कि जेव्हा जेव्हा ऑनलाईन डेटिंगचा विषय निघतो तेव्हा टिंडरचंच नाव समोर येतं. टिंडरमध्ये फिचर आहेत डबल टॅप, डेटिंग, रिलेशनशिप, फ्रेंडशिप असं बरच काही काही आहे. एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली आणि आपण त्या व्यक्तीच्या फोटोवर डबल टॅप केलं तर आणि समोरूनही तसेच घडलं म्हणजे मॅच झालं तरच चॅटिंगचे ऑप्शन ऑन होतात.

टिंडरच विशेष म्हणजे इथं थेट महिलांशी गप्पा मारता येत नाही. या ऍपची हि खासियत आहे कारण इतर ऍपवर थेट अकॉउंटशी इंटरॅक्ट करता यायचं, टिंडरवर जोवर समोरून मॅच होत नाही तोवर काहीच घडत नाही. टिंडर हे बेसिकली एखाद्या पत्त्याच्या कॅटसारखं आहे, ज्यात राईट स्वाईप म्हणजे आवडलंय आणि लेफ्ट स्वाईप म्हणजे रिजेक्टड असा मॅटर आहे.

टिंडरवर अजून लोक वाढतचं आहेत कारण यावर असलेला स्वायपिंगचा ऑप्शन. टिंडरच अजून एक वैशिष्ट्य म्ह्नणजे टिंडरने रियल आयुष्यातली डेटिंगची कन्सेप्ट उचलली आहे. पण खऱ्या आयुष्यातलं रिजेक्शन जितकं त्रास देत तितका त्रास टिंडर देत नाही. टिंडर जेव्हा पूर्णपणे डेव्हलप झालं पण ते विकायचं कसं याचा विचार सिन आणि जस्टिन हे करत होते.

इतर ऍप बनवणारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कुपन, डील, भारीतल्या ऑफर्स देतात पण टिंडरने काय केलं कि अगोदर कोर युजर्स ठरवले. पण टिंडरने इथं एक आयडिया केली कि आपल्या ऍपवर सगळ्यात आधी फिमेल ऍड केल्या पाहिजे आणि त्यामुळे आपसूकच मेल युजर्ससुद्धा ऍड होतील.

सिन आणि जस्टिन हे कॉलेजांमध्ये जाऊन टिंडरच महत्व पटवून देऊ लागले. जिथं जिथं तरुण मंडळी आहे तिथे तिथे ते ऍप प्रमोट करू लागले.

इथं अजून शक्कल त्यांनी लढवली कि ते बर्थडे इव्हेंट ऑर्गनाईज करायचे पण एंट्री फक्त त्याच लोकांना ज्यांनी टिंडर ऍप इंस्टाल केलेलं आहे. जिथं पोरींची संख्या टिंडरवर वाढली मागेमागे मुलांचीही संख्या वाढू लागली. लोकल सेलिब्रिटी लोकांना हाताशी धरून ऍप जगभरात हे ऍप पोहचलं.

२०१८ साली टिंडरचा रिव्हेन्यू ८०० मिलियन डॉलर होता. प्रेम शोधण्यासाठी लोकं काय किंमत मोजू शकतात याच उदाहरण म्हणजे टिंडर. आज घडीला टाईमपासचं आणि प्रेम शोधायचं साधन म्हणजे टिंडर ओळखलं जातं. आपल्याला काय मॅच नाही झालं तरी फरक पडत नाही आणि मॅच होऊनही काय असं जग जिंकणार आहोत आपण म्हणून मारा स्वाईप…ज्यांच्या सोयरिकी जमाना त्यांनी सुद्धा टिंडर वापरायला हरकत नाही झालं चुकूनमाकून मॅच तर काय घेता….

हे हा वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.