वरुण सरदेसाईंची शिंदे गटाने हकालपट्टी केली आहे; सेनेतल्या बंडाला युवासेनाही जबाबदार आहे का?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून शिवसेनवर दावा केल्यानंतर  शिंदे गटातर्फे पहिली हाय प्रोफाइल हकालपट्टी करण्यात आली आहे. 

शिवसेना युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

सुरातीपासूनच उद्धव ठाकरेंच्या भोवती काही जणांचा गोतावळा आहे ज्यामुळं उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचताच येत नाही असा आरोप होत होता. त्या काही जणांमध्ये वरुण सरदेसाई यांचंही समावेश असल्याचं म्हटलं जात होतं. या रागातूनच ही हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

हे सगळं चालू असताना रामदास कदम यांचंही एक स्टेटमेंट चर्चेत आहे ते म्हणजे

”माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं.”

शिवसेनेत युवासेनेमुळे झालेली खदखद यामुळे बाहेर पडत असल्याचं सांगण्यात येत आहे. युवासेनेच्या  स्थापनेपासूनच सेनेच्या जेष्ठ नेत्यांमध्ये असंतोष होता त्याला आता वाट मोकळी करून दिली जात आहेत अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

युवसेनेची स्थापनच मुळातच आदित्य ठाकरे यांना राजकारणात लाँच  करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे स्थापना झाली होती.

१७ ऑक्टोबर २०१० रोजी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात आली होती.

मात्र यामुळं घराणेंशीहीच सेनेमध्ये संस्थात्मीकरण झाल्याचा मॅसेज नेत्यांमध्ये गेला. 

ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आपल्या मुलाला सेट करायला बघत होते तसेच प्रयत्न शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही चालू केली. शिवसेनेतील नेते, उपनेते, विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक आदींनी आपल्या मुलांना युवासेनेतील पदे मिळवून दिली. आपल्याला वरचे पद मिळाल्यानंतर युवासेनेत सक्रिय असलेल्या मुलाला नगरसेवक आमदार याची उमेदवारी मिळावी यासाठी या नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावण्यास सुरवात केली.

मात्र गेली अनेक वर्षे शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावरून मिरवत, शाखेमध्ये पडेल ते काम करणारे शिवसैनिक या प्रकारामुळे नाराज झाले. 

बाकीच्या पक्षात कार्यकर्ते सतरंज्याच उचलत राहतात असा इतिहास असताना सेनेत मात्र तळागाळातल्या कार्यकर्त्याला कायम संधी दिली जात होती. रिक्षावाले, भाजीवाले आमदार खासदार मंत्री झाले हे चित्र सेनेत यामुळेच सर्र्रास पाहायला मिळतं.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा यांनीही या कार्यकर्त्यांमधील खदखद बोलून दाखवत या असंतोषाचा फायदा घेतल्याचं दिसतं. 

यात आता अजून एक गोम अशी आहे की बंडखोर आमदारांची मुलं जसे की प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनीच युवासेनेत मोठी पद अडवून ठेवली होती मात्र याच खापर मात्र आदित्य ठाकरे आणि वरून सरनाईक यांच्यावर आलं.

आदित्य ठाकरे यांच पक्षातील वजन वाढत होतं तसं युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील महत्व वाढत होतं. 

जुन्या शिवसैनिकांना युवासैनिकांकडून आव्हान निर्माण केलं जात होतं. २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यामुळे संघर्ष निर्माण होणार होता. शेवटी युवासैनिकांची तिकिटं कापून हा संघर्ष टाळण्यात आला.

आदित्य ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष ठाकरे घराण्यातील निवडणूक लढणारे पहिले आमदार आणि मग थेट  वडिलांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री यामुळं आदित्य ठाकरे यांचं पक्षाच्या कामकाजातील इंटरफेअर पण वाढला होता.

सेनेच्या अनेक मंत्र्यांच्या कामकाजातही आदित्य ठाकरे यांची ढवळाढवळ असायची असा आरोप केला जातो. 

तसेच त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात आदित्य ठाकरे यांच्यावर महत्वाची जबाबदारी आली होती. मात्र त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या.

आदित्य ठाकरे यांचा सर्वपक्षातील नेत्यांच्या मुलांशी चांगले संबंध ठेवण्याकडे कल मात्र त्याचवेळी ते लोकल राजकारण लक्षात घेत नसत असा बंडखोर आमदारांचा आरोप आहे. रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे यांच्याशी आदित्य ठाकरे चांगले संबंध राखून होते मात्र लोकल राजकारणात अदिती तटकरे सेना आमदारांचा खच्चीकरण करत होता याकडे आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं असा सरोप बंडखोर आमदारांचा आहे. 

विशेषतः ग्रामीण भागातील आमदारांना त्यांच्याशी जुळवून घेता आलं नाही. 

मुखमंत्र्यांची भेट घेतानाही आधी आदित्य ठाकरे यांना आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी आधी बोलावं लागायचं.आदित्य ठाकरेंच्या हे इतर सहकारी वरूण सरदेसाई, राहुल कनाला या शहरी युवा सैनिकांचा समावेश होता. त्यात आदित्य ठाकरेंच्या जवळचे हा एकच निकष लावून यांना पद दिली असल्याचाही आरोप होतो. 

 शिंदे गटाचा ज्यांच्यावर वरूण सरदेसाई राग आहे त्याची केस देखील अशीच आहे. 

वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. वरुण सरदेसाई शिवसेनेच्या युवासेनेच्या सचिवपदाबरोबरच  शिवसेनेचं आयटी सेलही सांभाळतात. निवडणुकीत त्यांनी अनेकदा शिवसेनेचे स्टार प्रचारक देखील राहिले आहेत. 

मात्र सरदेसाई यांचा सेनेतील दबदबा याहूनही मोठा आहे.

 वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत एवढ्याच कारणावर महविकासआघडीच्या शासकीय बैठकांना उपस्थित राहू लागले होते. यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वरुण सरदेसाई बैठकांमध्ये दिसेनासे झाले.

उद्धव ठाकरे सरकारनं तत्कालीन  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली होती मात्र त्याचवेळी वरुण सरदेसाई यांना मात्र सरकारनं सुरक्षा दिली होती. यावरूनही सेनेला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. 

वरुण सरदेसाई  यांच्यावर विरोधकांनी ‘सरकारी भाचा’ अशी टीका करण्यास सुरवात केली होती.

यामुळं त्यांच्या विरोधात असलेल्या असंतोषात अधिकच भर पडली. त्यात आदित्य ठाकरेंनी सेनेला राष्ट्रीय पातळीवरील वरील सर्वसमावेशक पक्ष बनवण्यासाठी घेतलेली मावळ हिंदुत्वाची भूमिका, उदारमतवादी विचार, यासाठी प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांसारखे लिबरल चेहरे कट्टर सैनिकांच्या पसंतीस उतरले नसल्याचं एकंदरीत निरीक्षण नोंदवलं जात.

पूर्वीच्या काली सेनेची युवकांची विंग म्ह्णून अखिल भारतीय विद्यार्थी सेना पुढे असायची. राज ठाकरे यांच्या झंझावाती नेतृत्व असूनही विद्यार्थी सेनेची शिवसेनेच्या पक्षीय राजकारण तेवढी ढवळाढवळ नव्हती असं राजकीय विश्लेषक सांगतात.

त्यामुळं आज जेव्हा सेना नेतृत्वाचा लोकप्रतिनिधींशी तुटलेला संपर्क, बाळासाहेबांची विचारांची शिवसेना राहिली नाही असे जेव्हा आरोप करून जेव्हा बंडखोर आमदार सेना नेतृत्वार तुटून पडत आहेत त्यात युवासेनादेखील रडारवर आहे एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.