प्रभाकरन हा एकमेव अतिरेकी होता ज्याच्याकडे स्वतःची लढाऊ विमाने होती…

श्रीलंकेतल्या सिव्हिल वॉरचा जनक म्हणून वेलूपिल्लई प्रभाकरनला ओळखलं जातं. राजीव गांधी आणि श्रीलंकन नेत्यांची हत्या घडवून आणणारा वेलूपिल्लई प्रभाकरन हा दोन्ही देशांसाठी डोकेदुखी होता. पण प्रभाकरनच्या नेतृत्व गुणांचं कौतुक करणारे लोकही आहेत.

प्रभाकरनला प्रामुख्याने ओळखलं जातं ते लिबरेशन टायगर्स अँड तमिळ ईलम [LITTE] यासाठी.

वेलूपिल्लई प्रभाकरनचं धोरण अगदी स्पष्ट होतं कि श्रीलंकेच्या उत्तरेला आणि पूर्वेला असणाऱ्या भागात तामिळ लोकांची लोकसंख्या जास्त होती आणि तिथं व्यवसाय चांगले होते तिथं आपला वेगळा देश बनवायचा.

यासाठी तब्बल २५ वर्षे LITTE आणि श्रीलंका यांच्यात युद्ध सुरु होतं.

प्रभाकरनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याच्या आईवडिलांचा तो सगळ्यात छोटा मुलगा होता. त्याला तीन भावंडे होती. वडील सरकारी अधिकारी होते. त्याचा जन्म श्रीलंकेच्या जाफनामध्ये झाला होता. श्रीलंकेत तामिळला साहित्य आणि कलेचं हृदय मानलं जातं. पण हा जाफना प्रांत तमिळ लोकसंख्या आणि श्रीलंका यांचा कचाट्यात सापडला.

प्रभाकरनने स्थापन केलेल्या LITTE ने स्वतंत्र देश बनवण्यासाठी आपला लढा सुरु केला. तो कुशल राजनीतीमध्ये पारंगत होता. श्रीलंकेचे नागरिक आणि सरकार तामिळ लोकांना योग्य वागणूक देत नाही, भेदभाव करतात असा LITTE संघटनेचा आरोप होता. प्रभाकरनने पुढे हिंसेचा मार्ग अवलंबला. वयाच्या १७ व्या वर्षापासूनच तो या प्रकारात आघाडीवर होता. 

१९८३ साली LITTE ने जाफना प्रांताच्या बाहेरील एका श्रीलंका सेनेच्या गस्तेवर असलेल्या गटावर हल्ला चढवला. यामध्ये १३ सैनिकांची हत्या  झाली.याला प्रत्युत्तर म्हणून श्रीलंकेत मोठा नरसंहार घडला. याला हजारो तामिळ नागरिक बळी पडले.

इथून श्रीलंकेत देशांतर्गत वादाला सुरवात झाली.

जाफनाचा महापौर हा प्रभाकरनच्या निशाण्यावर होता. आता तो निशाण्यावर असण्याचं कारण म्हणजे तो इतरांना सपोर्ट करायचा आणि तामिळ लोकांना धुडकावून लावायचा. हा महापौर एकदा मंदिरात गेला असताना तो पायऱ्याच चढत होता, तेव्हा समोर उभा होता प्रभाकरन. प्रभाकरनने पुढचा मागचा विचार न करता सरळ पिस्तूल काढलं आणि त्याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.

LITTE च्या मदतीने प्रभाकरनने श्रीलंकेच्या महत्वाच्या केंद्रांचा ताबा घेतला. इतकंच नाही तर तिथं त्यांच्या सोयीने ते कारभार करू लागले. 

२००६ साली श्रीलंका सरकारने LITTE संघटना कायमची संपवण्यासाठी एक सैन्य अभियान सुरु केला. श्रीलंकेने हे अभियान इतक्या आक्रमक पद्धतीने सुरु केलं होतं की एकवेळ LITTE सुद्धा दबावात होती. त्यावेळी प्रभाकरन म्हणाला होता कि,

मी दुष्मनांच्या हाती जिवंत पकडलं जाण्यापेक्षा मी सन्मानाने मरणं पसंत करील.

वेलूपिल्लई प्रभाकरनच्या सेनेत अगदी १४-१५ वर्षांची मुलंदेखील होती. LITTE हि आतंकवादी संघटना म्हणून जरी घोषित केली गेली तरी प्रभाकरन तिला तस मानायला मुळीच तयार नसायचा. तो म्हणायचा कि आमची कुठल्या धर्माविरुद्ध दुष्मनी नाही पण आमचे हक्क आम्हाला मिळत नसतील तर LITTE च्या तावडीतून कुणाचीही सुटका केली जाणार नाही.

प्रत्येक लष्करशहाप्रमाणे त्याच्याही काही विचित्र सवयी होत्या, तो कधी भात खायचा नाही. प्रभाकरनला वाटायचं की तांदळामुळे पिस्तुलचं ट्रिगर दाबायचं बोट शिथिल होऊन जाईल.

लिट्टे जेव्हा ऐन भरात होती तेव्हा प्रभाकरनने पाच विमाने खरेदी केली होती. लिट्टे तेव्हा जगातील एकमेव अतिरेकी संघटना होती ज्यांच्याकडे स्वतःची लढाऊ विमाने होती.

भारताचे पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेच्या महत्वाच्या नेत्यांची हत्या घडवून आणून वेलूपिल्लई प्रभाकरनने खळबळ उडवली होती. २००९च्या श्रीलंकेविरुद्धच्या लढाईत प्रभाकरन मारला गेला. LITTE चे बरेच लोकं मारले गेले.

आजही श्रीलंकेतील तामिळ लोक वेलूपिल्लई प्रभाकरनला शहिद मानतात तर इतर लोकं त्याला कुख्यात आतंकवादी आणि देशद्रोही मानतात ज्याने जागतिक पातळीवर राजकीय आतंकवाद पुढे आणला.

पण सरकार आणि LITTE च्या वादात हजारो लोकांचा निष्कारण प्राण गेला हि वाईट घटना घडली होती ज्याची जबाबदारी ना श्रीलंका सरकार घेत होतं ना LITTE घेत होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.