शेअर मार्केटचं अप्पर सर्कीट आणि लोअर सर्कीट नेमक काय असतय..? 

सध्या बर्गर किंग ने हवा केलेय. आत्ता आम्ही रोजचं मार्केट बघत नाय पण बर्गर किंग ला अप्पर आणि लोअर सर्कीट लागलं म्हणे, 

आत्ता सर्किट लागलं की ते शेअर्स खरेदी पण करता येत नाहीत आणि विक्री पण करता येत नाहीत एवढं बेसिक तर सगळ्यांनाच माहिती असतय. कोरोनाच्या सुरवातीला देखील आख्या मार्केटला सर्कीट लागलेलं. पण या किस्स्यांमध्ये दम नाही. खरा किस्सा अंबनीचा. अंबानीमुळे तीन दिवस मार्केट बंद राहिलेले. 

तो किस्सा तुम्ही पुढच्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकताय.. 

पण आपला साधा सरळ मुद्दा आहे तो सर्किटचा, हे सर्किट काय असतय आणि ते कशासाठी लावतेत. कोण लावतय, कस लावतेत वगैरे वगैरे… 

स्टॉक मार्केटमध्ये कधी कधी अप्पर किंवा लोअर सर्किट लागतं. हे सर्किट लागलं की आपणाला त्या दिवसासाठी ते विशिष्ट शेअर्स घेता येत नाहीत किंवा विकता येत नाहीत. म्हणजे त्या शेअरच ट्रेडिंग एका दिवसासाठी पुर्णपणे बंद राहतं.. 

तर शेअर्स मार्केटमध्ये प्रत्येक सेकंदाला उलाढाल होते. ही उलाढाल प्रामुख्याने बातम्या व अंदाजावर डिपेंड असते. म्हणजे एखादेवेळी एखादी बातमी फुटली तर अचानक लोक खरेदी तर करू लागतात किंवा शेअर्स विकू तर लागतात. 

आत्ता समजा अचानकपणे लोक शेअर्स विकू लागले तर शेअर्सची प्राईज मोठ्या प्रमाणात ढासळू शकते. किंवा लोक खरेदी करू लागले तर अचानक शेअर्सची प्राईज वाढू शकते. स्कॅम सिरीज आठवतेय का. हर्षद मेहता म्हणल्यावर कितीही कानात टॉगं डॉंग म्यूझिक वाजत असलं तरी याच माणसामुळे एका दिवसात मार्केट झोपलेलं हे विसरून चालत नाही. त्यामुळे कित्येक लोकं आयुष्यात कायमची झोपली ही गोष्ट वेगळी.. 

तर आपला मुळ मुद्दा सर्किटचा. मार्केटची हीच अनिश्चितता दूर करण्यासाठी सर्किट सिस्टिम आणण्यात आली. 

या सिस्टीमनुसार एका दिवसात एका विशिष्ट टक्केवारीपर्यन्तच एखाद्या शेअर्सची प्राईज कमी किंवा जास्त होवू शकते. त्यासाठी शेअर्सच्या प्राईजमध्ये टक्केवारी ठरवून त्याहून कमी किंवा जास्त असे दोन सर्किट टाकले जातात. समजा एका दिवसात त्या शेअर्सने आपलं लोअर सर्किट गाढलं तर त्या दिवसासाठी त्या शेअर्सच ट्रेडिंग बंद राहतं. 

आत्ता ही टक्केवारी किती असते. 

भारतात ही टक्केवारी, 

२ टक्के, ५ टक्के, १० टक्के आणि २० टक्के असतं. 

ही टक्केवारी इक्सेंज ठरवतं. 

आत्ता समजा बर्गर किंगची शेअर्स प्राईज १०० रुपये आहे आणि त्याची सर्किट टक्केवारी ५ टक्के आहेत तर एका दिवसात बर्गर किंग कमीत कमी ९५ रुपयांपर्यन्त ढासळू शकतो किंवा १०५ रुपयांपर्यन्त वाढू शकतो. हिच टक्केवारी २० टक्के असती तर एका दिवसात बर्गर किंग १२० रुपयांपर्यन्त वाढू शकतो आणि ८० पर्यन्त ढासळू शकतो. 

आत्ता शेअर्सची ही १०० रुपये प्राईज कधीची धरली जाते तर आदल्या दिवशीची क्लोजिंग प्राईज पाहिली जाते. मार्केट ओपन झाल्यानंतर क्लोजींग प्राईजपेक्षा सर्किट टक्केवारी किती वर व किती खालीला सर्किट लागणार हे ठरवलं जातं. 

आत्ता दूसरी गंम्मत हे सर्किट कितीही दिवस टिकू शकतं. म्हणजे दूसऱ्या दिवशी मार्केट सुरू झाल्या झाल्या काही सेकंदातच एखादा शेअर्स आपल्या अप्पर किंवा लोअर सर्किटला शिवून टाकतो.

मग दिवसभर तो सर्किटवरच थांबतो आणि ट्रेडिंग बंद राहतं, अशा वेळेला काही काही वेळेला एक्सेंज त्या शेअर्सची सर्किट व्हॅल्यू अर्थात टक्केवारी वाढवू शकतं. म्हणजे बर्गर किंगची सर्किट व्ह्यॅल्यू ५ टक्के असेल तर एकाच दिवशी ती व्ह्यॅल्यू १० टक्के सुद्धा करू शकतात मग त्या शेअर्समध्ये पुन्हा ट्रेंडिंग सुरू होवू शकतं.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Manale shubham shahuraj says

    This is nice page bhidu

Leave A Reply

Your email address will not be published.