योगी आदित्यनाथ पैसे वाटून मत विकत घेत आहेत..?

बाजारात इलेक्शन आले आहेत. खरं खोटं सांगून लोकांची मत पदरात पाडून घेण्याचा खेळ सुरू आहे. वास्तविक हिच खरी लोकशाही असते. या खऱ्याखोट्यात कोणीच धुतलेला तांदळासारखा नसतो हे सर्वसामान्य नागरिकांना कळतं. म्हणून तर गेली ७० वर्ष आपली लोकशाही व्यवस्था शाबूत आहे. 

असो तर या खऱ्या खोट्यात एक नवा व्हिडीओ जनतेसमोर आला आहे.

व्हिडीओत खुद्द उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पैसे वाटताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ एका खुर्चीवर बसले आहेत आणि शेजारची व्यक्ती एकएकाला पैसै देत आहे. प्रत्येकजण हे पैसे घेतो आणि योगी आदित्यनाथ यांचा जयजयकार करतो, त्यांच्या पाया पडतो आणि निघून जातो. 

हा व्हिडीओ आय सपोर्ट रविश कुमार या ग्रुपवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या ग्रुपवरचा या व्हिडीओला सत्तर हजार शेअर्स आहेत. बाकी इतर फेसबुक पेज व wtsapp मार्फत देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. 

Screenshot 2019 03 25 at 4.36.32 PM

या व्हिडीओ शेअर करत अनेकांनी प्रश्न विचारला की, लोकसभेच्या काळात योगी आदित्यनाथ अशाप्रकारे पैसै कसे वाटू शकतात? पैशावर मत विकत घेत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. 

या व्हिडीओचा नेमका इतिहास काय याचा शोध घेतल्यानंतर यु ट्यूबवर सर्वात प्रथम हा व्हिडीओ पोस्ट केलेल्या व्यक्तीच नाव मिळालं. 2012 साली विनय कुमार गौतम अस नाव असणाऱ्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ सर्वात प्रथम पोस्ट करण्यात आला होता. 

त्यानंतर थेट 2019 मध्ये हा व्हिडीओ अमित शहा फॅन्स नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

13 मार्च 2019 रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला 17 लाख व्हू असून तो सहा हजार लोकांनी शेअर केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अमित शहा फॅन्स या पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करत असताना तो ओल्ड इज गोल्ड या अर्थाने करण्यात आला होता. मात्र आय सपोर्ट रवीश कुमार या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ वेअर इज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा प्रश्न विचारत शेअर करण्यात आला. 

BBC मार्फत करण्यात या व्हिडीओची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की फ्रेम तपासल्यानंतर या नोट जून्या असल्याचं लक्षात येतं. विशेष म्हणजे हा व्हिडीओ देखील 2012 साली सर्वात प्रथम पोस्ट करण्यात आला होता. यावरुन तो व्हिडीओ आत्ताचा नसून जुना आहे हे सिद्ध होतं. 

तरिही प्रश्न उरतो की, देण्यात येणारे पैसै हे मतांसाठी आहेत का? 

तर नाही,

हा व्हिडीओ सर्वात प्रथम पोस्ट केलेल्या कुमार गौतम यांच्या मते एप्रिल 2012 साली गोरखपूरच्या काही शेतांमध्ये आग लागली होती. शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यावेळी गोरखपुरचे खासदार असणारे योगी आदित्यनाथ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले होते. हा व्हिडीओ अशाच शेतकऱ्यांची मदत करत असताना शूट करण्यात आला होता. यामध्ये योगी आदित्यनाथ हे आगीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहेत. अस सांगण्यात आलं. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.