अमेरिका केवळ अफगाणिस्तान मध्येचं नाही तर वेळोवेळी तोंडावर पडली आहे

अफगाणिस्तानला युद्धजन्य परिस्थितीत सोडल्याने अमेरिकेवर सर्व स्थरातून टीका होत आहे. मात्र अशा प्रकारे एखाद्या देशाला संकटात सोडून अंग काढून घेण्याची अमेरिकेची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी अमेरिकेने काही देशांमधून पळ काढला आहे. अफगाणिस्तान मधील या परिस्थितीला अमेरिकेला दोषी धरण्यात येत आहे. कारण की, अमेरिकन सैनिकांच्या वापसी नंतर लगेच तालिबानी संघटनेनी अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली आहे.

तालिबानने आपला मनमानी कारभार सुरु केला असून अनेक बंधने तेथील नागरिकांवर लादली  आहेत.यासाठी तेथील नागरिक अमेरिकेला जबाबदार धरत आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन मात्र आपल्या निर्णय योग्य असल्याचे सांगत सांगत. अमेरिकन सैन्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे त्याचे म्हणणे आहे.

एकीकडे आपण जगात सर्वात शक्तिशाली असल्याचे दाखविण्यासाठी अमेरिका गरज असणाऱ्या आणि संकटात सापडलेल्या देशांना मदतीचा हात पुढे करतो. मात्र, काही काळानंतर त्या देशाला संकटातून बाहेर काढण्यापूर्वीच मदतीचा हात मागे घेतो. अशा प्रकारे मदतीचा हात काढून घेणारा अफगाणिस्तान हा काही पहिला देश नाही. व्हीएतनाम, क्युबा आणि सोमालिया या देशांना सुद्धा संकटातुन बाहेर न काढता अमेरिका बाहेर पडला आहे.

स्वताला सुपर पावर म्हणून घेणारा अमेरिका संकटात सापडल्या नंतर कशा प्रकारे बाहेर पडतो हे सर्व जगाने पाहिले आहे.

व्हीएतनाम

कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामचे नेतृत्व हो-ची-मिन यांच्याकडे होते आणि ते चीन आणि रशियन साम्यवादाचे समर्थक होते. तर दक्षिण व्हिएतनामचे नेतृत्व कॅथोलिक राष्ट्रवादी नगो दीन्ह दीम हे करत होते. १९५५ मध्ये उत्तर व्हिएतनाम ने दक्षिण व्हिएतनाम विरोधात युद्ध करण्याची तयारी सुरु केली होती.

अमेरिका साम्यवादाचा विरोध करत दक्षिण व्हिएतनामच्या समर्थानात उतरले होते. त्याच्या मदतीसाठी सैन्य पाठविले होते आणि त्यांना शस्त्र पुरविले होते. अमेरिकेच्या मदतीने दीम ने हो-ची-मिनच्या सैन्याला मारणे सुरु केले होते. १९६० पर्यंत या युद्धात अमेरिकेचे ९ हजार सैन्य सामील झाले होते. 

मात्र १९६३ मध्ये नगो दीन्ह दीम च्या सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोधात सत्ता उलटून लावली. अमेरिकेला वाटले हे सगळे उत्तर व्हीएतनामच्या सुचेना नुसार सुरु आहे. अमेरिकेने लगेच उत्तर व्हीएतनाम वर बॉम्बचा वर्षाव केला. व्हीएतनाम या ऑपरेशनला थंडर असे नाव दिले होते. अमेरिकेने साडे चार लाख सैनिक येथे पाठविले होते. उत्तर व्हीएतनाम वर अमेरिका १९ वर्ष बॉम्ब टाकत राहिला. मात्र त्यापुढे उत्तर व्हीएतनाम झुकले नाही. १९६७ पर्यंत व्हिएतनाममधील अमेरिकन सैन्याची संख्या पाच दशलक्षांवर पोहोचली होती

१९६९ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बनले रिचर्ड निक्सन. त्यांच्यावर व्हीएतनाम मधील सैनिक माघारी बोलावेत असा दबाव होता. जानेवारी १९७३ मध्ये पॅरीस येथे अमेरिका, उत्तर आणि दक्षिण व्हीएतनाम मध्ये शांतता करार झाला आणि अमेरिकन सैनिक मागे घेण्यात आले.

अमेरिकन सैन्य माघारी जाताच उत्तर व्हीएतनाम ने दक्षिण व्हीएतनाम वर हल्ला केला. ३० एप्रिल १९७५ मध्ये कम्युनिस्ट व्हीएतनामच्या सैन्याने सायगॉन ( आताची व्हीएतनामची राजधानी) मध्ये घुसून तेथे असणाऱ्या राहिलेल्या अमेरिकन्सला पळवून लावले.

अफगाणिस्तानातील सैन्याच्या संख्येच्या पाच पट आणि १९ वर्षांच्या भीषण बॉम्बस्फोटानंतरही अमेरिका कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामला आपल्यासमोर झुकवू शकला नाही. अमेरिकेचा सार्वधिक मानहानी कारक पराभव म्ह्णून याकडे पाहण्यात येते.

क्युबा

ही घटना आहे १९५९ मधील.  कम्युनिस्ट क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो ने क्युबाचे हुकुमशहा फुलजेन्सिओ बॅटिस्टाकडून सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर कॅस्ट्रोने क्युबा मधील अमेरिकन नागरिकांची संपत्ती जप्त करायला सुरुवात केली होती. त्यांनी लॅटिन अमेरिकन देशांमध्ये कम्युनिट क्रांतीबद्दल बोलण्यास सुरुवात केली होती. आणि अमेरिकेला उघड-उघड विरोध करायला सुरुवात केली होती. यामुळे अमेरिकन चिडले आणि फिडेल कॅस्ट्रोला आपला शत्रू मानू लागले. असं सांगण्यात येते की, अमेरिकेने ६३४ वेळा फिडेल कॅस्ट्रोला मारण्याचा प्रयत्न केला.

फिडेल कॅस्ट्रो क्युबात आल्या नंतर अनेकांनी देश सोडला होता. अशा नागरिकांशी अमेरिकेने संपर्क साधायला सुरु केले होती. अमेरिकेने सीआयएच्या माध्यमातून बे ऑफ पिग्जच्या मार्गाने हल्ला केला. यासाठी सीआयएने फिडेलच्या विरोधकांना प्रशिक्षण आणि शस्त्रे दिली. अमेरिकेची मदत घेत १२०० पेक्षा अधिक विद्रोही तरुणांनी पिग्स खाडीतून जात क्युबा वर हमला केला होता. कॅस्ट्रोला या हल्ल्याची माहिती आधीच मिळाली होती. क्यूबाच्या हवाई दलाने हल्लेखोरांच्या बहुतेक नौका बुडवल्या.

त्यानंतर या विद्रोही तरुणांनी अमेरिकेवर आरोप केले की, वेळेवर वायुदलाची मदत आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे आमचे १०० सहकारी मारले गेले. तर ११०० तरुणांना क्युबाने पकडले होते.  योजनेनुसार, अमेरिकेला हल्लेखोरांना मदत करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात बॉम्बफेक करायची होती, पण हल्ला अयशस्वी झाल्याचे पाहून अमेरिका मागे हटली आणि लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

या घटनेनंतरच सोव्हिएत संघाने क्युबामध्ये आण्विक क्षेपणास्त्रे तैनात केली. यासंदर्भात समजताच अमेरिकन नौदलाने क्युबाला वेढा घातला. सोव्हिएत क्षेपणास्त्र हटवले नाही तर अमेरिकेने आण्विक युद्धाची धमकी दिली. दोन्ही देश आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आले. शेवटच्या क्षणी सोव्हिएत संघाने क्षेपणास्त्र काढून टाकण्यास सहमती दर्शविली आणि संकट टळले.

एक प्रकारे क्युबा ने अमेरिकाला शह दिला असे म्हणायला जागा आहे.  

सोमालिया

जानेवारी १९९१ मध्ये आफ्रिकेतला देश सोमालियामध्ये एका सशस्त्र गटांनी राष्ट्रपती मोहम्मद सियाद बरेची सत्ता उखडून फेकली. सत्तेसाठी सगळे आपापसात भांडू लागले. संपूर्ण सोमालियामध्ये सत्तेसाठी युद्ध सुरु झालं. मुख्य विद्रोही गट युनायटेड सोमालिया काँग्रेसमध्ये फूट पडली. एका गटातील नेता अली मेहदी मुहंमद याने स्वतःला राष्ट्रपती घोषित केलं तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व मोहम्मद फराह अदिदि करू लागला.

अंतर्गत वादांमुळे लोकांमध्ये भीती पसरू लागली. लोकांच्या मदतीसाठी युनायटेड नेशन्स ऑपरेशन इन सोमालिया २ सुरु करण्यात आलं. पण मोहम्मद फराह अदिदि समूह युनायटेड नेशन या मदतीचा विरोध करू लागले. अदिदी वर दबाव ठेवण्यासाठी अमेरिकन एक टास्क फोर्स बोलावून घेतली. हीच अमेरिकेची मोठी चुकी झाली. या गटांनी अमेरिकेलाच टार्गेट केलं.

हेलिकॉप्टर पाडण्यात आले आणि अमेरिकेविरुद्ध हे युद्ध सुरु झालं. या लढाईत १९ अमेरिकी सैनिक मरण पावले. विद्रोही गटांनी अमेरिकेच्या या सैन्यांच्या प्रेतांची दुर्दशा केली. रस्त्यावर हि प्रेत सडत ठेवली. यानंतर अमेरिकेने सर्वसामान्य लोकांच्या मदतीने हे मिशन मागे घेतलं.

अशा प्रकारे अमेरिका जगभरात देशांना मदत करण्यासाठी गेले मात्र त्यांना संकटातून बाहेर काढण्यापूर्वीच मागे हटले आहे. आता अफगाणिस्तान मधील परिस्थिती सुद्धा अशीच झाली आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.