बिहारचा गडी म्हणतोय टुरिस्ट व्हिसा दिला म्हणून अफगाणिस्तानात आलोय

गेले आठ दिवसापासून अफगाणिस्तान मधील आपण परिस्थिती पाहतो. त्यात आज तालिबान्यांनी काबुल शहरावर ताबा मिळविला आहे. जगभरातील नागरिक अफगाणिस्तान सोडत आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सुद्धा देश सोडला आहे. आता संपूर्ण देशात तालिबानने

एवढ्या सगळ्या राड्यात मात्र एक बिहारी बाबू म्हणतोय की, मला अफगाणिस्तान सरकारने टुरिस्ट व्हिसा दिला त्यामुळे मी फिरायला आलोय.

तर बिहारी बाबूचं नाव आहे शुभम कुमार.

शुभम हा बिहार मधील मुंगेर येथील आहे. शुभमचे १२ वीचे शिक्षण २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. त्यावेळीच त्याने ठरविले होते की जगभरात सगळीकडे फिरायचे आहे. त्याने आता पर्यंत ४० देश फिरून पूर्ण झाले आहे. तसेच आता पर्यंत १ लाख पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. तेही केवळ २ वर्षात. तो सध्या अफगाणिस्तान मध्ये एका मित्रासोबत फिरत आहे. त्याचे युटूबवर १४ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.

Nomed shubam असे त्याच्या युटूब चॅनेलचे नाव आहे.   

शुभम कुमारने आता पर्यंत दक्षिण आफ्रिका, कजाकिस्तान, रशिया, म्यानमार, व्हियेतनाम, चीन बरोबरच इराण, जॉर्जिया सारख्या वॉर कंट्री मध्ये फिरून आला आहे. त्याने देशांतर्गत फिरायला १३ व्या वर्षापासून सुरुवात केली होती. त्याने काही पैसे जमा केले होते आणि तो लहान मुलांचे क्लास घेत असे त्यातून जमा झालेल्या रक्कमेतून पहिली ट्रीप केली होती. ती ट्रीप होती रशियाची

शुभमला अनेकांकडून फिरण्यासाठी लागणाऱ्या पैशांबाबत विचारणा करण्यात येते. याबाबत त्यांनी सांगितले की, जग फिरण्यासाठी जास्त पैसे लागत नाही. मात्र नक्कीच त्याच नियोजन चांगल कराव लागत. काहीही झालं तरी शुभम एका दिवसाचा खर्च ४०० रुपयांच्यावर येऊ देत नाही.

शुभमने  जगातील सर्वात थंड रशियातील ओम्याकोनला भेट दिली आहे. तसेच तर जगातील सर्वात उष्ण  सुदान मध्ये सुद्धा फिरून आला आहे.

सध्या अफगाणिस्तान मध्ये कसा पोहचला

शुभम सध्या रोड ट्रीप करतोय. उजबेकिस्तान मधून २ ऑगस्ट रोजी तो अफगाणिस्तान मध्ये आला होता. मजारे शरीफ पासून त्याने ट्रीपला सुरुवात केली होती. तालिबानच्या चेक पोईट चकमा देण्यासाठी शुभम ने अफगाणीस्तान मध्ये विमान प्रवास केला आहे.  टुरिस्ट गाईड न घेता त्याने प्रवास केला आहे.

त्याने आठ दिवसात अफगाणिस्तान मधील अनेक शहरांना भेट दिल्या असून तेथील माहिती आपल्या युटूब चॅनेल वर दाखवली आहे.

शेवटी १५ ऑगस्ट रोजी एका अफगाणीस्तानी पोलिसांनी शुभमला व्हिडीओ बनवितांना पाहिले आणि तो अडचणीत आला. त्यांनतर त्याला सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यात आले. त्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करण्यात आली. यानंतर शुभमची माहिती भारतीय दूतावासाला देण्यात आली.

भारतीय दुतावासाने शुभमला अफगाणिस्तान मध्ये का गेला असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, मी टुरिस्ट व्हिसा मिळावा अशी मागणी केल्या नंतर तो मिळाला म्हणून मी अफगाणिस्तान मध्ये आलो असल्याचे सांगितले.

चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला एकच पर्याय देण्यात आला. तो म्हणजे अफगाणिस्तान सोडण्याचा. शेवटी १६ ऑगस्टला पुढच्या ट्रीपसाठी दुबईला निघाला होता. त्यापूर्वी त्याला कोव्हिड टेस्ट करायला सांगितली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले हे समजू शकले नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.