फारूख अब्दुल्लांनी जाहीर सभेत काश्मिरी पंडितांची माफी मागून राजकारणाला नवीन वळण दिलंय

काश्मीरी पंडितांचा मुद्दा राजकारण्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिलायं. जम्मू काश्मीरमधल्या या कश्मीर पंडितांच्या स्थलांतरवरून एकमेकांना दोष देण्याची संधी सत्ताधारी आणि विरोधक कधीच सोडत नाहीत. आत्ताही असचं काहीसं चित्र पहायला मिळालं

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी  पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने काश्मिरी पंडितांचा व्होट बँक म्हणून वापर केल्याचा आरोप  फारूख यांनी केला.

आपल्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारची चांगलीचं शाळा घेतली. त्यांनी म्हंटले की, भाजपने केवळ काश्मिरी पंडितांच्या नावावर राजकारण केले, प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीही केले नाही.

यासोबतच अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांची माफीही मागितली.  ९० च्या दशकात खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन रोखू शकले नाही, त्याबद्दल माफी मागतो, असही ते यावेळी म्हणाले.

फारुख अब्दुल्ला हे पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आहेत.  या बैठकीत आघाडीने काश्मिरी पंडितांबाबत तीन ठराव पारित केले. पहिला, काश्मिरी पंडितांना राजकीय आरक्षण.  दुसरा, काश्मिरी हिंदू मंदिर संरक्षण विधेयक मंजूर करणे आणि तिसरे, काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी भरीव आर्थिक पॅकेज.

या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर इतर मुद्द्यांवरूनही हल्लाबोल केला.  ते म्हणाले की, मोदी सरकारने  आधी कृषी विधेयके मंजूर केली होती आणि ती आता मागे घेतली आहेत. कारण निवडणूकीच्या तोंडावर पक्षाचे राजकीय नुकसान होऊ नये.  सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला.

अब्दुल्ला यांनी महिला नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित करत म्हंटले की, मोदी सरकारने अद्याप महिला आरक्षण विधेयक का आणले नाही, संसदेत त्यांचे 300 पेक्षा जास्त सदस्य आहेत, पण त्यांना नको आहे की, महिलांनी समोर याने आणि पुरूषांच्या बरोबरीने काम करावे. 

दरम्यान, भाजपवर निशाणा साधत असताना  फारुख यांनी काश्मिरी पंडितांची सुद्धा माफी मागितली अब्दुल्ला म्हणाले,

 “आमच्या राजवटीत आम्ही काश्मिरी पंडितांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.  पण काही घटकांनी आमच्या प्रयत्नांना खोडा घातला. आपलं घर दार सोडून जाताना काश्मिरी पंडितांना खूप त्रास सहन करावा लागला आहे.  याला मर्यादा नाही.”

फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले,

 “काही शक्तींनी काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला.  पंडितांना खोर्‍यातून हाकलणारे मुस्लिम नव्हते, तर काही स्वार्थी लोक होते. पंडितांना खोर्‍यातून हाकलून दिल्यावर काश्मीर आपलाच होईल, असे त्यांना वाटत होते.  पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, ते कधीही त्यांचे  ध्येय साध्य करू शकणार नाही.  काश्मिरी पंडितांना आश्रय दिल्याबद्दल मी जम्मूच्या जनतेचे अभिनंदन करतो.”

एवढचं नाही तर हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, द्वेषाऐवजी प्रेमाला स्थान दिले पाहिजे असेही अब्दुल्ला म्हणाले. आपण आपले मन साफ ​​केले पाहिजे आणि जम्मू-काश्मीरलाही वाचवले पाहिजे.  असही अब्दुला यावेळी म्हणाले.

 “आम्ही नेते स्वतःच्या फायद्यासाठी लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहोत.  पण लोकांनी एकजूट दाखवली पाहिजे.  जातीयवादी शक्तींचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाही पाहीजे.”

म्हणजे एका आकडेवारीनुसार सहा हजार  घरांत की आतापर्यंत जवळपास 900 घरचं तयार झाली आहेत. 

दरम्यान फारूक अब्दुल्ला यांच्या आरोपावर भाजपनं सुद्धा प्रतिउत्तर दिलयं. माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र अंबरदार यांनी काश्मीरमधील पंडितांच्या हत्याकांडासाठी फारुख अब्दुल्ला यांना जबाबदार धरले आहे.  नॅशनल कॉन्फरन्सचा पाया खोटेपणा आणि फसवणुकीवर आधारित असल्याचे म्हणतं भाजप नेत्यांनी अब्दुल्ला  त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

जम्मूच्या त्रिकुटानगर येथील पक्षाच्या मुख्यालयात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अंबरदार म्हणाले की, काश्मीरमधील पंडितांना हुसकावून लावण्याच्या कटात नॅशनल कॉन्फरन्सचाही हात होता.  नव्वदच्या दशकात काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्यात फारुख अब्दुल्ला यांनी घेतलेल्या भूमिकेवर चर्चा व्हायला हवी.

आता नेतेमंडळींचे आरोप-प्रत्यारोपाचं सत्र नेहमीचचं. पण खरं सांगायचं झालं तर कश्मीरी पंडितांचा प्रश्न  आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारांच्या काळात नेहमीच ऐरणीवर राहिलाय. कलम 370 होण्यापूर्वीची जी परिस्थिती होती, तीचं आत्ताही पहायला मिळत आहे.

म्हणजे  मोदी सरकारने कलम 370 हटवला, त्यावेळी सरकारने  कश्मीर पंडितांसाठी 6000 ट्रांझिट घरं बनवून देणारं असं जाहीर केलं होतं. पण सरकारचं हे आश्वासन फारचं  मंद गतीनं  सुरू असल्याचं समजतंय.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.