क्रिकेटर, वकील, आरजे बनण्याची हौस भागली शेवटी भावाच्या पाठोपाठ बॉलिवूडमध्ये आला

शाळेत एक प्रश्न विचारायचे बघा तुला मोठेपणी कोण व्हायचंय ? मग आपण सगळे तोडकेमोडके उत्तरं देऊन मोकळे व्हायचो की कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला गायक व्हायचंय, कोणाला वकील व्हायचंय तर कोणाला इंजिनिअर तर कोणाला शिक्षक. अशी उत्तर देऊन झाल्यावर एक वर्गात अँटिक पीस असायचाच की त्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याला सचिन धोनी बनायचं असतं तर कधी राजकारणी तर कधी शेतकरी तर कधी हिरो आणि बरच काय काय. असाच तो वर्गातला हुशार पोरगा होता अपारशक्ती खुराना. आपल्याला सगळं जमतं या कॅटेगिरीत जितकी लोकं येतात ना त्यापैकीच एक म्हणजे हा भिडू.

18 नोव्हेंबर 1987 रोजी अपारशक्ती खुरानाचा जन्म चंदीगड, पंजाबमध्ये झाला. लहानपणीपासूनच हा भिडू जास्त ऍक्टिव्ह होता. खरंतर तो एक चांगला खेळाडू म्हणून पुढे येत होता. शाळेत त्याच्याइतक उत्तम क्रिकेट कोणी खेळत नसे. स्टेट लेव्हलला अपारशक्ती खुराना टॉपचा क्रिकेटर होता. क्रिकेटमध्ये हरियाणाच्या अंडर 19 संघाचा तो कर्णधार होता. क्रिकेटर बनण्याची त्याची सुप्त इच्छा होती आणि घरच्यांनाही वाटलं होतं की पोरगं आता क्रिकेट मधेच करियर करतं.

पण घडलं उलटं, चंदीगडवरून दिल्लीला शिफ्ट झाल्यावर अपारशक्ती खुराना लॉ ची प्रॅक्टिस करू लागला. पुढे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं आणि अचानक भयानक वकिली सुरू झाली. वकिली करत असतानाच डान्स प्रॅक्टिससुद्धा त्याची एका बाजूला सुरू होती. मल्टी टास्कर म्हणजे काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अपारशक्ती खुराना. याच डान्स क्लासमध्ये लव्ह अफेअर झालं आणि पुढे लग्नही झालं.

आता सगळं सुरळीत असतानाही वकिलीत अपारशक्तीचं मन अभ्यासात लागत नव्हतं. मग त्याने आरजे म्हणून काम करायला सुरुवात केली. इथून करिअरची सुरवात झाली आणि दिल्लीतल्या बिग एफएम वरून त्यानं काम सुरू केलं.

इथून तो रेडिओ जॉकी अपारशक्ती खुराना म्हणून नावारूपास आला. आपल्या आवाजात बदल करण्यासाठी अपारशक्तीने IIT दिल्लीमध्ये धर्मा टेक नावाचा थेटर ग्रुप जॉईन केला.

अपारशक्तीने बरेच रेडिओ शो केले हळूहळू तो टीव्ही शोजच्या होस्टिंगकडे वळला. अनेक गाजलेल्या रियालिटी शोजचा तो भाग होता.

नंतर मग त्याने स्पोर्टचा एक शो होस्ट केला जो प्रचंड हिट राहिला. नंतर गडी घुसला सिनेमा क्षेत्रात. पहिला सिनेमा होता सात उचक्के. पण तो तितका हिट राहिला नाही.

अपारशक्ती खुरानाने खऱ्या अर्थाने पदार्पण केलं ते म्हणजे दंगल या सिनेमातून. या सिनेमाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आणि अपारशक्ती चांगलाच फेमस झाला. नंतर बद्रीनाथ की दुल्हनियामध्ये सुद्धा अपारशक्ती झळकला.

मेन म्हणजे अपारशक्तीचा भाऊ जो सध्याचा बॉलिवूडचा टॉपचा हिरो आहे तो म्हणजे आयुष्यमान खुराना. पण भावाच्या ओळखीचा फायदा न उचलत स्वतःच्या टॅलेंटवरून अपारशक्ती बॉलिवूडमध्ये आला आहे आणि आपलं स्टारडम बनवत आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.