ब्रिटिश काळात ‘पंखेवाले’ म्हणून मिळणारी शिक्षा एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हती…

उकाड्यात अर्ध्या लोकांना बर्फाचा गोळा आठवतो तर अर्ध्या लोकांना तो ‘फ्रीज मध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या का ? ‘ तो वाला जोक आठवतो. त्यात फॅशन ब्युटी गँग यांचं वेगळच गणित असतं स्कार्फ पासून ते उन्हापासून बचाव करणाऱ्या क्रीम लावून बाहेर पडणं.

पण कुलर मध्ये पाणी भरणे, फ्रीज मध्ये बाटल्या भरून ठेवणे हे एकवेळ ठिक आहे पण जुन्या काळात गेलं तर तेव्हा काय फॅन, एसी, कुलर ह्या भानगडी नव्हत्या मग तेव्हाचे लोकं काय करत असतील हा प्रश्न साहजिकच आहे.

आपल्या गावाकडे सुद्धा लाईट गेली तर हवेसाठी पदरापासून ते पेपर पर्यंत सगळे फॅनची भूमिका बजावतात. पण हे वारा घालण्याच भीषण प्रकरण ब्रिटिश काळात वेगळचं होतं.

नरक परवडेल पण पंखेवाला बनू नका असं जुने लोकं तेव्हाच्या तरुण पोराना सांगत असे. पण हे पंखेवाला हे प्रकरण जर नीट समजून घेतलं तर कळेल की नरक यातना कशाला म्हणतात.

ब्रिटिशांकडून शोषणाचा अजून एक प्रकार अवलंबला गेला तो म्हणजे पंखेवाला.

युरोपात तेव्हा भयानक उन्हाळा पडलेला. ब्रिटन तेंव्हा 40 डिग्री सेल्सिअसला पोळत होतं. पहिल्यांदाचं जगाने असा भीषण उन्हाळा पाहिला होता. याच दरम्यान ब्रिटिशांनी इतर देशांवर राज्य गाजवायला सूरवात केली होती.

इतक्या भयाण उन्हाळ्यात ब्रिटिशांनी कसा तग धरला आणि शोषणाचा अजून एक नवीन पायंडा पाडला याचं उत्तर म्हणजे पंखावाला किंवा फॅन लेबर. तत्कालीन ब्रिटिश लोकांच्या मते भारतात उन्हाळा हा एप्रिल पासून सुरू होतो ते थेट ऑक्टोबर एंडला संपायचा. हे सगळे गर्मीचे महिने असल्याने सरसकट तो उन्हाळाच घोषित केला जायचा. या सिजनला एका बाजूला पंखा सीजन असेही म्हटले जात असे. 

हा सगळा सीजन म्हणजे गर्मी, घामाच्या धारा, जीवाची तगमग आणि उन्हाच्या झळा सोबतीला डासांची गुणगुण असा सगळा लवाजमा. ह्या सगळया त्रासामुळे गोऱ्या ब्रिटिशांना झोपच लागायची नाही. यातूनच जन्म झाला पंखेवाले लोकांचा. पंखेवाले यासाठी नेमले गेले की ब्रिटिशांना सुखाची झोप लागावी म्हणून.

आता हे जे पंखेवाले नेमले गेले हे ते मागासवर्गीय होते, उच्चवर्णीय नव्हते त्यामुळे फिक्स त्यांचीच निवड होणार होती. महिन्याला त्यांना फक्त 3 रूपये पगार मिळायचा.

ब्रिटिश लोकांना उन्हाळ्यापासुन वाचवण्यासाठी ही पंखे वाल्यांची तरतूद करण्यात आली आणि ती शोषण म्हणूनच प्रचलित झाली. दोन शिफ्ट मध्ये या लोकांचं काम असे. बहुतेक ब्रिटिश लोकं त्यांचे दुपारचे पंखेवाले रात्री झोपताना वारा घालण्यासाठी बोलवत असे.

त्यामुळे या कामगारांना झोप कमी आणि काम जास्त करावं लागत असे. हातपंखे असल्याने या कामगार लोकांची मोठी दमछाक व्हायची. आपल्या मालकासाठी जनावरागत राबणे हेच त्या पंखेवाल्या लोकांच्या नशिबी होतं.

आता हे ब्रिटिश पण लय डेंजर होते, थोडा जरी गॅप पडला तरी ते कामगार लोकांवर डाफरत असे. वारा लागत राहिला पाहिजे असा त्यांचा होरा होता. उलट हे ब्रिटिश लोकं या कामगारांना आळशी म्हणून त्यांचा उध्दार करत असे.

जर झोपेत घाम आला तर ते पंखेवाल्यांना बदडून काढत असे. यात शिक्षेच्या दुसऱ्या कठीण पद्धती होत्या त्या म्हणजे पाण्याचं भांडं फेकून मारणे असेल किंवा एखाद्या दोरीला त्या कामगारांचं डोकं बांधणे जेणेकरून तो कामगार झोपी जाणार नाही. अशा कित्येक डेंजर शिक्षा या पंखेवाल्या लोकांना होत्या.

म्हणूनच ब्रिटिश काळात पंखेवाले ‘ म्हणून मिळणारी शिक्षा एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हती.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.