तसं झालं तर सर्फराज अहमद पाकिस्तानचा पंतप्रधान होईल.

काल पाकिस्तान न्यूझीलंड वर्ल्डकप मॅच झाली. न्यूझीलंड या वर्ल्ड कप मध्ये एक पण मॅच न हरता सुपरफॉर्ममध्ये होती तर पाकिस्तान या वर्ल्डकपमध्ये बराच खराब खेळ करत होती. भारताविरुद्ध सामना हरल्यावर तर तिथल्या पब्लिकने सगळे टीव्ही फोडून टाकले होते. पण अशाच या गण्डक्या पाक टीमने न्यूझीलंडला ६ विकेटने धूळ चारली आणि सगळ्यानाच धक्का दिला.

हा चमत्कार घडला तरी कसा? खरोखरच यामागे काही जादू आहे काय?

यंदाचा पाकिस्तानचा वर्ल्डकपचा प्रवास आणि १९९२ चा प्रवास अगदी सेम सुरु आहे. तेव्हा प्रमाणे यावेळी सुद्धा राउंड रॉबिनमध्ये सामने सुरु आहेत. त्यावेळी प्रमाणे यावेळी देखील पाकने पहिली मॅच हरली, दुसरी मॅच जिंकली. अगदी तेव्हा प्रमाणेचं यावेळी देखील त्यांची तिसरी मॅच पावसामुळे रद्द झाली, चौथी मॅच ते हरले., पाचवी हरले. पण सहावी आफ्रिकेविरुद्धची मॅच ते जिंकले आणि याच क्रमाने सातवी मॅच सुद्धा ते जिंकलेत.

आता याला योगायोग म्हणावा की आणखी काही पण पाकिस्तानमधले क्रिकेट फन्स अल्ला १९९२ची जादू रिपीट करतोय असं समजूत करून घेऊन खुश आहेत. बघू आता खरोखर तसच होतंय का ते.

सध्या एक ट्विट व्हायरल होतंय. खुद्द भारताचे इंग्लिश तज्ञ खेळमुलगा(इंग्लिश मध्ये अर्थ पाहावा) शशी थरूर यांनी काल दुपारी रीट्विट केले होते.

शशी थरूर यांचं म्हणण आहे की असेच योगायोग होत राहिले तर पाकिस्तान २०१९चा वर्ल्डकप तर जिंकेल पण अजून २६ वर्षांनी इम्रान खान प्रमाणे सर्फराज अहमद पाकिस्तानचा पंतप्रधान बनेल. 

कालची मॅच झाल्यावर फक्त पाकिस्तान भारतचं नव्हे तर जगभर हा जोक व्हायरल होतोय.

आता म्हणल तर हा एक जोकच. किती जरी नाही म्हटल तरी इम्रान खान आणि सर्फराजची तुलना होऊ शकत नाही. इम्रान खान खेळत असताना आणि रिटायर झाल्यावरही जेव्हढा पॉप्युलर होता त्याच्या २%टक्के सुद्धा कोण सर्फराजला ओळखत नाहीत.

इम्रान खान उंच तगडा देखणा म्हणून सुद्धा भारत पाकिस्तानच्या मुलीमध्ये फेमस आहे. सर्फराज आपल्या गंडलेल्या पत्रकार परिषदा,सुटलेलं पोट, आळस देतानाचे मिम्ससाठी फेमस आहे.

सगळ्यात महत्वाच म्हणजे इम्रान खान हुशार आहे, धूर्त आहे. इम्रान खानकडे राजकारणात यशस्वी होण्यासाठीचे सगळे गुण आहेत. तो ऑक्सफर्डमध्ये शिकलाय. बिचाऱ्या सर्फराज कडे राजकारण करण्याची लबाडी देखील नाही आणि ऑक्सफर्डसुद्धा म्हणायला येत नाही. 

पण म्हणतात न क्रिकेट आणि राजकारण यात काहीही होऊ शकत. चमत्कार घडेल, पाकिस्तान वर्ल्डकप जिंकेल, सर्फराज पंतप्रधान पण होईल. पंतप्रधान होण्यासाठी इंग्लिश यायलाच पाहिजे असे नाही. असे बरेच उदाहरण आपल्या आसपास आहेत.

बघू खरोखर सर्फराज चा आंबा पडतोय का ते.

हे ही वाच भिडू.