Browsing Category

तात्काळ

अमरसिंग नसते तर बच्चनला मुंबईत टॅक्सी चालवायची वेळ आली असती.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. सिनेमात शाहरुख,सलमान,आमीर ही ताज्या दमाची खान मंडळी आली होती. महानायक अमिताभच वय झालं होतं. त्याला मिळणाऱ्या पिक्चरचा ओघ आटत चालला होता. जे सिनेमे रिलीज होत होते त्याला पूर्वी प्रमाणे प्रतिसाद नव्हता. दोस्त…
Read More...

फक्त पेटलेला पंजाबच नाही तर आसाम, मिझोराम शांत करण्याचं श्रेय राम प्रधान यांनां जातं.

प्रशासकीय अधिकारी मनात आणल तर किती चमत्कार करू शकतात याचं उदाहरण म्हणजे भारताचे माजी गृह सचिव राम प्रधान. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचे विश्वासातले सनदी अधिकारी. जेव्हा चीनच्या युद्धानंतर हिमालयाने सह्याद्रीला साद घातली…
Read More...

कोरोनाच्या नावाखाली मानवी अवयवांची तस्करी सुरू आहे ? खरं काय आहे वाचा..

कोरोनाच्या दूप्पट वेगाने अफवा पसरवण्याचे उद्योग सुरू आहेत. बर अशा अफवांमध्ये WHO सुद्धा जबाबदार आहे. ते एकदा सांगतात स्पर्शातून कोरोना पसरत नाही, तर एकदा सांगतात हवेतून कोरोना पसरतो. एकदा सांगतात मास्क वापरण्याची गरज नाही तर एकदा सांगतात…
Read More...

जिथे ३५ रुपयांसाठी मजुरी केली आज तिथेच कोरोनाशी लढण्यासाठी भलंमोठ सेंटर उभारलं.

मुनाफ पटेल. भारतीय क्रिकेटचा दुर्लक्षित झगमगता तारा. तो आला तेव्हा त्याची हवा झाली होती की त्याची एॅक्शन सेम टू सेम ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्रा प्रमाणे आहे. तीच अॅक्युरसी, तीच लाईन आणि लेन्थ, त्याच्याहून भन्नाट स्पीड. २०११ च्या वर्ल्डकप…
Read More...

रस्त्यावर दूध ओतल्याने शेतकऱ्यांना कोणता फायदा होतो..?

राज्यात पुन्हा एकदा दूध प्रश्नाच्या आंदोलनाने डोके वर काढले आहे. दूध खरेदीचा दर 18 ते 22 रुपये इतका कमी आला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यवस्थापन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये दूध विकावे लागत आहे. पाण्यापेक्षा दुधाचा दर कमी आहे.…
Read More...

२००७ साली चिघळलेलं दुध आंदोलन विलासरावांनी अमेरिकेतून सोडवलं होतं

कोरोनाचा कहर सुरु होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. कित्येकांचे रोजगार गेले. बाजार, कारखाने बंद असल्यामुळे शेतात माल असूनही शेतकऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत. गेल्यावर्षीचा महापूर, यावर्षीच चक्रीवादळ त्यात हा…
Read More...

जगदाळे आडनावाचा माणूस देखील जगातली टॉपची व्हिस्की तयार करू शकतो.

निळकंठ राव जगदाळे गेले तेव्हा मित्राने विचारलं, जगदाळे कोण होते ?  तेव्हा दूसऱ्यानं उत्तर दिलं त्यांची कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची. दारूचे ब्रॅण्ड माहित असणे यात नक्कीच मोठ्ठेपणा नाही, पण भारतात एखादा व्हिस्कीचा ब्रॅण्ड उभा रहात…
Read More...

मुहम्मद सिनेमा आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्राकडे सिनेमावर बंदी घालण्याची केलेली मागणी

2015 मध्ये रिलीज झालेला मजीद माजिदीचा मुहम्मद हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येतोय, तर त्यावर बंदी घालावी अशी मागणी रझा अकॅडमीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली, आणि गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला तातडीने पत्र लिहीत या सिनेमाच्या ऑनलाईन…
Read More...

ग्रामपंचायतींवर नुसता प्रशासक नाही नेमचायं ; समुजन घ्या संपुर्ण मॅटर

मोठं-मोठे विचारवंत आणि पत्रकार सांगुन गेले, दिल्लीतल्या राजकारणावर अभ्यास करा पण गावकी-भावकी आणि गल्लीतल्या राजकारणावर जास्त विचार करु नका. ते खूप खोल आणि गंभीर असतयं. पण आज आम्ही ही रिस्क घेत आहोत. कारण विषय पण तसाच आहे. तर विषय असा…
Read More...

वाढदिवसाच्या दिवशीच बीटकॉईनवाल्यांनी ट्विटरचा बाजार उठवला.

बीटकॉईन म्हणजे लफडा असच काहीस गेल्या काही वर्षात होऊन बसलंय. या क्रिप्टो करन्सीचा फुगा एवढा वाढून बसला होता की अमिताभ बच्चनला सुद्धा त्यांनी गंडा घातला होता. काल त्यांचे टार्गेट ठरले ट्विटरवरचे सेलिब्रेटी. १४० शब्दांसारख्या कमीतकमी…
Read More...